हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपद निवड बिनविरोध होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:31 PM2020-01-02T15:31:30+5:302020-01-02T15:44:21+5:30

गणाजी बेले यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे.

Hingoli Zilla Parishad Chairman - Vice-president may be elected unopposed | हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपद निवड बिनविरोध होण्याची शक्यता

हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपद निवड बिनविरोध होण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून अजूनही एका नावावर शिक्कामोर्तब झाले नाही

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे गणाजी बेले यांचा एकमेव अर्ज आहे. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून मनीष आखरे व यशोदा दराडे यांचे अर्ज आले आहेत. 

जिल्हा परिषदेत कोणाची होणार आघाडी; अजूनही अनिश्चितताच!

बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत हे तीन अर्ज आले आहेत. त्यामुळे गणाजी बेले यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. छाननीनंतर ही निवड घोषित होणार आहे. तर राष्ट्रवादीकडून अजूनही एका नावावर शिक्कामोर्तब झाले नाही पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून एक नाव िश्‍चित होईल, अशी चिन्हे आहेत. त्यानंतर एक उमेदवार माघार घेऊ शकतो. तूर्त तरी राष्ट्रवादी समोरील पेच सुटलेला नाही.

सभापतीपदासाठी इच्छुक शांत
सभापतीपदी निवडीसाठी १४ जानेवारी २0१९ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची अजून काहीच हालचाल दिसत नाही. विशेष म्हणजे अजून वाटाघाटींची बैठकच नसल्याने ही बैठक होईपर्यंत आपल्या पक्षाच्या पदरात नेमके काय पडणार आहे, हे कळणारही नाही. त्यामुळेही अनेक इच्छुकांनी तूर्त आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घातल्याचे दिसून येत आहे. मात्र १ जानेवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा रंगत आहे. ही बैठक झाल्यानंतरच यात नेमकी कोणती पदे कोणत्या पक्षाकडे राहतील, याचा मेळ लागणार आहे. त्यात शिवसेनेला अध्यक्षपद कायम ठेवून सभापतीपद बदलून पाहिजे आहे. त्यामुळे आता हे सभापतीपद नेमके कोणते राहील, याची काही श्वासती नाही. या पदावरूनही स्पर्धेतील मंडळी समोर येणार असल्याचे दिसते.

Web Title: Hingoli Zilla Parishad Chairman - Vice-president may be elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.