हिंगोलीत तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्ह्यात २८ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:23 AM2020-06-26T11:23:01+5:302020-06-26T11:23:26+5:30

औंढा तालुक्यात सर्वाधिक 28% पर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे.

Hingoli receives an average rainfall of 28 mm | हिंगोलीत तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्ह्यात २८ मिमी पाऊस

हिंगोलीत तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्ह्यात २८ मिमी पाऊस

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात काल रात्री विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. आज सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी 28 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 

यात हिंगोली तालुक्यात 38 मिमी, सेनगाव तालुक्यात 43 मिमी, वसमत तालुक्यात 6 मिमी औंढा तालुक्यात, कळमनुरी दहा मिमी तर औंढा तालुक्यात 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने तुफान झोडपले. सेनगाव तालुक्यात गोरेगाव आजेगाव तर औंढा तालुक्यात येहळेगाव येळेगाव या परिसरात अतिवृष्टी झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. गतवर्षी याच काळात वार्षिक सरासरीच्या अवघे चार टक्के पर्जन्य झाले होते. यंदा 20 टक्केवर पोहोचले आहे. जिल्ह्यात एकूण  सरासरी 172 मिमी पाऊस झाला आहे. औंढा तालुक्यात सर्वाधिक 28% पर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे.

Web Title: Hingoli receives an average rainfall of 28 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.