वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:49 PM2021-06-01T16:49:28+5:302021-06-01T16:50:58+5:30

याप्रकरणी ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे.

District Central Bank employee beaten at Wasmat | वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

Next

वसमत ( हिंगोली ) : येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यास बँकेत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वसमत पोलिसांत तक्रार दिली आहे. मारहाण करणाऱ्या विरोधात करवाई करण्याची मागणी करणारे निवेदन कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांनाही दिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वसमत येथे कार्यरत कर्मचारी बालाजी गणेशराव साखरे ( ३२ ) हे सोमवारी बँकेच्या वेळेत काम करत असताना, एका इसमाने आत प्रवेश करू देण्याच्या कारणावरून वाद घातला, आणि बोलत असताना त्या इसमाने त्यांना चापट बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने बँकेत एकच गोंधळ उडाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा इसम वसमत तालुक्यातील वीरेगाव येथील असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत रीतसर तक्रार देण्यात आहे. मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. याप्रकरणी ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी तक्रार बँक कर्मचारी बालाजी साखरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार व वसमत शहर पोलीस ठाणे येथे दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: District Central Bank employee beaten at Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.