कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:35 PM2020-01-23T17:35:44+5:302020-01-23T17:36:51+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे झाला अपघात

Container - Wrecked in a two-wheeler accident - Killed on the spot | कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार

कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार

googlenewsNext

औंढा नागनाथ : औरंगाबाद-जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या समोरासमोर अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ( दि. २३ ) दुपारी २ वाजता घडली. शिवाजी यादवराव  शिंदे व आकाश किशन शिंदे अशी मृतांची नावे असून ते चुलते व पुतणे असल्याची माहिती आहे. हा अपघात गोळेगाव नजीक झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद- जिंतूर महामार्गावरून औरंगाबादहून एक कंटेनर ( क्रमांक NL01N 5295 ) हैद्राबादकडे जात होता. दरम्यान, गोळेगावहून शिवाजी यादवराव शिंदे ( ३१, रा. नागणगाव ता. जितुर ) व आकाश किशन शिंदे ( १९, रा. नागणगाव ) दोघे चुलते-पुतणे जिंतूरकडे दुचाकीवरून (MH22 AL9900 ) जात होते. महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात शिवाजी शिंदे आणि आकाश शिंदे दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Web Title: Container - Wrecked in a two-wheeler accident - Killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.