the bride has the right to vote before the marriage | आधी लग्न लोकशाहीचे;वधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार
आधी लग्न लोकशाहीचे;वधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार

डोंगरकडा (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील वधूने बोहल्यावर चढण्याआधी वाजतगाजत मिरवणूक काढून मतदानाचा हक्क बजावला आहे. या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील भाटेगाव येथील सोनी अवधुतराव हक्के या वधूचा विवाह श्रीकांत मस्के रा. जयपूर ता. वाशिम या नवरदेवाशी १८ एप्रिल रोजी ११ वाजता ठरला होता. लग्न भाटेगाव येथे ११ वाजता झाले. लग्नाच्या आधी सकाळीच वधूची वाजतगाजत मिरवणूक काढून काढण्यात आली. त्यानंतर वधूने मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी नवरीचे वडील पोलीस पाटील अवधुतराव हक्के, संजय बहातरे, अकलवंत राठोड, संदीप राठोड, तालाठी आर. डी. गिरी, राजू क्षीरसागर, झोनल आॅफिसर भागा नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Web Title: the bride has the right to vote before the marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.