संतापजनक ! जमिनी लगतच्या वीजतारांनी घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 06:38 PM2021-10-19T18:38:59+5:302021-10-19T18:41:45+5:30

वीजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Annoying! Lands nearby power lines, killing the farmer | संतापजनक ! जमिनी लगतच्या वीजतारांनी घेतला शेतकऱ्याचा बळी

संतापजनक ! जमिनी लगतच्या वीजतारांनी घेतला शेतकऱ्याचा बळी

Next
ठळक मुद्दे महावितरणचा भाेंगळ कारभार उघड

वारंगा फाटा ( हिंगोली ) : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतातून चारा घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे १८ ऑक्टाेबर राेजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.

१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील शेतकरी मंगेश किसन कदम (वय ४९) हे आपल्या शेतातील सर्वे क्रमांक ४२९ मधून जनावरांसाठी चारा घेऊन जात होते. यादरम्यान घोडा कामठा येथून डोंगरकडा ३३ केव्ही उपकेंद्रास विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा डोक्याला सहजच लागतील अशा पद्धतीने लोंबकळलेल्या आहेत.

सदरील शेतकरी गवताचा भारा डोक्यावर घेताच लाेंबकळलेल्या वीजताराला स्पर्श हाेताच जाेरात धक्का लागला यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच नुकताच पाऊस पडला असल्याने शेतातही पाणी साचलेले हाेते. जमीनीवर खाली पाणी आणि वर वीजेचा धक्का लागल्याने मंगेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अगोदरच शेतकरी अस्मानी संकटाने त्रस्त असताना, महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे वारंगा फाटा येथील ग्रामस्थ संतापले आहेत. याविषयी महावितरणला कळविले असता, डोंगरकडा येथील शाखा अभियंता पी. डब्लु. जाधव यांनी केवळ घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेविषयी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. यासंदर्भात डोंगरकडा शाखा अभियंता पी. डब्लू. जाधव यांना विचारले असता, या घटनेची माहिती वरिष्ठांना ऑनलाईन कळविणार आहे. संबंधित घटनेचा पंचनामा करण्याकरिता वरिष्ठ येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Annoying! Lands nearby power lines, killing the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.