हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांसाठी ५८.३२ कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 02:03 PM2021-02-16T14:03:59+5:302021-02-16T14:05:13+5:30

औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ३२२ कोटी २८ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती.

Additional funds of Rs. 58.32 crore sanctioned for development works in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांसाठी ५८.३२ कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर

हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांसाठी ५८.३२ कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देबैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करून वेळेत खर्च करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

हिंगोली : जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत प्रत्यक्ष १०१ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ३२२ कोटी २८ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत ५८.३२ कोटी अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा १६० कोटी रुपयांचा झाला असून त्यास वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेत आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक संपन्न झाली. या बैठकीस पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आमदार राजू नवघरे, सतीश चव्हाण, विक्रम काळे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव एन. आर. गद्रे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासनाचे केले कौतुक
तसेच बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हिंगोली जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती निधीमधून कोविड-१९ करिता भौतिक पायाभूत उत्कृष्ट सोयी-सुविधा, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, वन पर्यटन आदी उत्कृष्ट कामे केल्याबद्दल ५८.३२ कोटी अतिरिक्त निधी वाढवून देत असल्याचे सांगून सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करून वेळेत खर्च करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

Web Title: Additional funds of Rs. 58.32 crore sanctioned for development works in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.