ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला बळी; पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:19 PM2021-01-23T12:19:13+5:302021-01-23T12:22:11+5:30

घटनास्थळी आलेल्या मयताच्या आई व नातेवाईक यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

Accidental death after hitting a bike to trolley | ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला बळी; पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; एक गंभीर जखमी

ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला बळी; पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; एक गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देडिग्रस कऱ्हाळे ता. हिंगोली येथील दोन तरुण परीक्षेसाठी नांदेडला जात होतेवसमत तालुक्यातील कौठा पाटीवर ट्रॅक्टर ट्राली पंचर झाल्याने उभी होती.

कौठा : उज्जवल भविष्याचे स्वप्न रंगवत पोस्ट विभागाच्या परीक्षा देण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांची नवी दुचाकी उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यात एका तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना वसमत तालुक्यातील कौठा पाटीवर शनिवारी ( दि. २३ ) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. घटनास्थळी आलेल्या मयताच्या आई व नातेवाईक यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

डिग्रस कऱ्हाळे ता. हिंगोली येथील शुभम गोविंद पाईकराव व आणखी एकजण कुऱ्हे (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे नांदेड येथे होणाऱ्या भारतीय डाक विभाग पोस्टाच्या परीक्षा देण्यासाठी भल्या पहाटे हिंगोली - नांदेड मार्गे नांदेडकडे जात होते. वसमत तालुक्यातील कौठा पाटीवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली पंचर झाल्याने ट्राली उभी होती. शनिवारी पहाटे ४ ते ४: ३० च्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या या दोघांना उभ्या ट्रॉलीचा अंदाज न आल्याने पाठीमागून धडक दिली. यात शुभम पाईकराव याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतचा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणास नागरिकांनी नांदेड येथे उपचारासाठी हलविले आहे.


अपघाताची माहिती डिग्रस कऱ्हाळे येथे कळताच शुभमची आई, वडील, भाऊ व इतर नातेवाईक आले. तेव्हा मृतदेह उचलण्यात येत होता,ते पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. आईचा आक्रोश पाहून घटनास्थळी जमलेल्या लोकांनाही अश्रू अनावर झाले. अपघातस्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी यांच्यासह नरवडे, चव्हाण आदींनी भेट देऊन मदतकार्य केले.

Web Title: Accidental death after hitting a bike to trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.