नांदेड-हिंगोली रोडवर अपघात! दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 11:39 AM2021-02-14T11:39:24+5:302021-02-14T11:42:13+5:30

Nanded-Hingoli Road Accident : दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी आहेत.

Accident on Nanded-Hingoli road! Two killed, two injured in two-wheeler collision | नांदेड-हिंगोली रोडवर अपघात! दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

नांदेड-हिंगोली रोडवर अपघात! दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

googlenewsNext

आखाडा बाळापूर (हिंगोली) - नांदेड-हिंगोली रोडवर साळवा शिवारात शनिवारी (१३ फेब्रुवारी) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जगदीश केशवराव पतंगे (वय २६ वर्ष, राहणार घोडा), प्रशांत उर्फ सोनू विजय मुधोळ ( वय 24, राहणार आखाडा बाळापूर) या दोघांचा अपघातातमृत्यू झाला आहे. तर राजेश दत्तराव पतंगे (रा. घोडा ) ,प्रदीप मारोतराव निर्मळ (राहणार साळवा ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार फकीरा चव्हाण, सुखदेव जाधव, वाघमारे, खिल्लारे घटनास्थळी पोहोचले. मृत्यू झालेल्यांचे पार्थिव आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. आज त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 

Web Title: Accident on Nanded-Hingoli road! Two killed, two injured in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.