हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी २.५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:43 PM2019-12-26T18:43:31+5:302019-12-26T18:49:53+5:30

जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे.

2.5 crore for the repair of primary health center in the Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी २.५ कोटींचा निधी

हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी २.५ कोटींचा निधी

Next
ठळक मुद्देडीपीसीतून झाली निधीची तरतूद लवकरच सुरु होणार कामे

हिंगोली :  जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौर उर्जा यंत्रणा उभारण्यासह परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे सौर उर्जा संच १५ लाख तर पेव्हर ब्लॉक बसविणे १0 लाख, सिरसम आरोग्य केंद्रात सौर संच ७.५0 लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, वसमत तालुक्यातील हयातनगर आरोग्य केंद्र सौर संच ७.५0 लाख, टेंभूर्णी आरोग्य केंद्र सौरसंच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, गिरगाव सौर उर्जा संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, कळमनुरी तालुक्यातील पोतरा आरोग्य केंद्र सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, रामेश्वर तांडा आरोग्य केंद्र सौरसंच ७.५0 लाख, औंढा तालुक्यातील लोहरा आरोग्य केंद्र सौर संचास १५ लाख, सिद्धेश्वर आरोग्य केंद्र सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी सौर संच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाग, कवठा सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १५ लाख, साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर संच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख असा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदाही झाल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीकडून या कामांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीत नियोजनही झाले असून या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. या कामांमुळे आरोग्य केंद्रांचा परिसर स्वच्छ व नेटका राहण्यास मदत होणार असून वीज समस्येतून आरोग्य केंद्रांची मुक्तता होणार असल्याचे जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले. तर पुढील टप्प्यात उर्वरित कामे घेतल्यास जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आरोग्यसेवा बळकटीकरणाचे प्रयत्न
दिवसेंदिवस आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी जि.प.कडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवेत अडचणी येतात. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.४जेथे रुग्णसंख्या जास्त आहे, अशा ठिकाणी या नव्याने होणाऱ्या सुविधांचा फायदा होणार आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्क व मानव विकासच्या निधीतून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाट, गाद्यांची व्यवस्था करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी डॉक्टरांच्या नेमणुका आहेत. मात्र काही प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांत नेमलेले बीएएमस डॉक्टर हजर राहात नसल्याची बोंब होत असल्याने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: 2.5 crore for the repair of primary health center in the Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.