वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसने वाढवला डोळ्यावरचा ताण, करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:42 PM2021-07-20T15:42:41+5:302021-07-20T15:43:15+5:30

वर्क फ्रॉम होममुळे तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यावरही ताण येतो. आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा...

Work from home, online classes increase eye strain, do 'these' remedies | वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसने वाढवला डोळ्यावरचा ताण, करा 'हे' उपाय

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसने वाढवला डोळ्यावरचा ताण, करा 'हे' उपाय

Next

वर्क फ्रॉम होममुळे तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यावरही ताण येतो. आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा... 

मसाज
तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा.  मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत होते.

हाताच्या तळव्यांचा स्पर्श
योग विद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. 2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

थंड दूध
डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

काकडी
काकडीमध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडीमधील अ‍ॅस्ट्रींजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

गुलाबपाणी
नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अ‍ॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाबपाण्यात  कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.

Web Title: Work from home, online classes increase eye strain, do 'these' remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.