जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 03:16 PM2020-02-09T15:16:59+5:302020-02-09T15:27:12+5:30

जेव्हा बाळाचा जन्म होतो. तेव्हा जोरजोरात रडायला सुरूवात होते.

Why does a newborn baby need to cry within 24 hours after birth | जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं?

जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं?

googlenewsNext

जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाची जोरजोरात रडायला सुरूवात होते. बाळाचं रडणं हेच बाळाचा जन्म होण्याचे संकेत असतात. पण काही नवजात बालकं ही जन्म झाल्यानंतर लगेच रडत नाहीत.  ही खूपच सामान्य गोष्ट आहे. पण जन्म झाल्यानंतर लगेचंच रडणं गरजेचं असतं का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, चला तर मग जाणून घेऊया जन्म झाल्यानंतर रडणं किती गरजेचं असतं. जर नवजात बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर त्याच्या रडण्याकडे लक्ष देणं ही गोष्ट फार महत्वाची असते.

जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी आईच्या गर्भातून वेगळं होत असतं. जन्माला आल्यानंतर बाळ (बेबी फर्स्ट क्राय)   जेव्हा पहिल्यांदा रडतं. तेव्हा फुप्पुसं आणि हार्ट हे व्यवस्थित काम करत आहेत. याचे संकेत असतात. रडल्यामुळे बाळाच्या आरोग्याबद्दल समजतं.  जर बाळ जन्म झाल्यानंतर जोरात रडत असेल तर बाळाचं आरोग्य उत्तम आहे. जर बाळ कमी आवाजात रडत असेल याचा अर्थ असा असू शकतो  की बाळाला काही शारीरिक त्रास किंवा समस्या असू शकतात. 

म्हणून  नवजात बाळ जन्म घ्यायच्या आधी गर्भनळीच्या माध्यामातून श्वास घेत असतो. जन्म झाल्यानंतर काही सेकंदानी बाळ स्वतः श्वास घ्यायला लागतं. जेव्हा बाळ श्वास  घेत असतं त्यावेळी नाक आणि तोंडातून तरल पदार्थ बाहेर येत असतो. या प्रक्रियेदरम्यान बाळ रडत असते. जेव्हा बाळ स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतं. त्यावेळी तरल पदार्थ बाहेर येत नसतो. त्यावेळी डॉक्टर सेक्शन ट्यूबच्या मदतीने हे  करतात. ( हे पण वाचा-सावधान! हृदयाचे ठोके थांबवू शकतं नसांमध्ये जमा असलेलं कॉलेस्ट्रॉल, जाणून घ्या उपाय )

लहान मुलांचं रडणं हे खूपचं सामान्य आहे.  या सगळ्या गोष्टी बाळाच्या आईला माहीत असणं गरजेचं आहे. तज्ञांच्यामते  २४ तासांमधून २ ते ३ तास बाळाचे रडणं खूपच सामान्य आहे.  जर बाळ ४ तासांपेक्षा जास्त रडत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायला हवा. जसजसं बाळाचं वय वाढत जातं तसतसं  रडण्याचं प्रमाण कमी होत जातं. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल 'गोलो डाएट', जाणून घ्या कसं)

Web Title: Why does a newborn baby need to cry within 24 hours after birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.