कोरोना संकट काळात Dolo-650 गोळी का लोकप्रिय झाली? कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:43 AM2022-01-23T10:43:24+5:302022-01-23T11:02:51+5:30

Dolo 650 : ही औषधाची गोळी ताप आणि अंगदुखीवर काम करते. याचे कॉम्बिनेशन पॅरासिटामॉल औषधासारखे आहे. ही गोळी मायक्रो लॅबद्वारे तयार करण्यात आली आहे.

why did this drug become popular in the era of corona such was the reason for the record breaking-sales | कोरोना संकट काळात Dolo-650 गोळी का लोकप्रिय झाली? कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितलं कारण...

कोरोना संकट काळात Dolo-650 गोळी का लोकप्रिय झाली? कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितलं कारण...

googlenewsNext

नवी दिल्ली : कोविशील्ड लसीप्रमाणेच डोलो-650 (Dolo-650) या गोळीनेही कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. या गोळीची लोकप्रियता इतकी वाढली की, देशभरातील डॉक्टर आणि रूग्णांनी मोठ्याप्रमात खरेदी केली. ही औषधाची गोळी ताप आणि अंगदुखीवर काम करते. याचे कॉम्बिनेशन पॅरासिटामॉल औषधासारखे आहे. ही गोळी मायक्रो लॅबद्वारे तयार करण्यात आली आहे.

डोलो-650  गोळीसाठी कधीही सार्वजनिक जाहिरात करण्यात आली नव्हती. आम्ही या गोळीच्या लोकप्रियतेने आश्चर्यचकित झालो आहोत, गोळीच्या विक्रमी विक्रीनंतर आमची जबाबदारी वाढली आहे आणि आम्ही आमच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत, असे या औषध कंपनी मायक्रो लॅबचे अध्यक्ष आणि एमडी दिलीप सुराणा यांनी 'मनीकंट्रोल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच, जवळपास प्रत्येक कोरोना रुग्णाच्या स्लिपवर डोलो-650 लिहिलेले असते. या औषधाच्या प्रभावामुळे ते लोकप्रिय झाले. लोकांनी या गोळीचे फायदे त्यांच्या प्रियजनांसोबत शेअर केले, असे दिलीप सुराणा यांनी सांगितले.

डोलो-650  गोळी 'सौम्य वेदनाशामक' म्हणजे वेदना कमी करणारे आणि 'अँटीपायरेटिक' म्हणजे ताप कमी करणारे या श्रेणीत येते. दिलीप सुराणा म्हणाले की, बाजारात पॅरासिटामॉल 500 एमजी श्रेणीमध्ये अनेक नावे आहेत आणि अनेक कंपन्या ते बनवतात. त्यावेळी याच प्रकारची औषधे बाजारात आणली तर आपणही त्याच गर्दीचा भाग होऊ, असे दिसून आले, अशा परिस्थितीत डोलो 650 गोळी बाजारात लाँच करण्यात आली. ही पॅरासिटामॉलपेक्षा जास्त कार्य करते. पॅरासिटामॉल 500 फक्त ताप आणि वेदना कमी करण्यासाठी आहे, तर डोलो 650 वेदना आणि तापाच्या वाढलेल्या व्याप्तीवर देखील कार्य करते. पॅरासिटामॉल हे 500 च्या पुढे औषध आहे आणि लोकांना त्याचा प्रभाव जाणवला आहे.

कोरोनादरम्यान लोकांना डोलो-650 ही सर्वोत्तम गोळी वाटली. या दरम्यान लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते, डॉक्टर देखील रुग्णांना प्रत्यक्ष पाहत नव्हते. अशावेळी डोलो-650 गोळीने कोरोनाच्या मुख्य लक्षणांवर प्रभावी परिणाम दाखवला आणि लोकांना आराम मिळाला. या कारणास्तव लोकांनी व्हॉट्सअॅप, एसएमएस आणि व्हॉईस मेसेजमध्ये याचा भरपूर प्रचार केला. कोरोनाच्या काळात एका व्यक्तीकडून सुरू झालेली प्रशंसा दुसऱ्यापर्यंत पोहोचली आणि असंख्य लोक त्यात सामील झाले. आज डोलो-650 गोळी देशातील अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे, असे दिलीप सुराणा यांनी सांगितले. 

कोरोनादरम्यान अन् लस दिल्यानंतरही...
दिलीप सुराणा यांनी सांगितले की, डोलो 650 गोळीला दुहेरी पसंती मिळाली. कोरोना झाल्यानंतर लोकांनी ही गोळी घेतली. तर कोरोना लसीनंतरही डॉक्टरांनी डोलो 650 गोळी खाण्याचा सल्ला दिला होता. लसीकरण मोहिमेदरम्यान, मायक्रो लॅब्सने पोस्टर लावले आणि लोकांना सांगितले की, तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही. देशातील जवळपास सर्व लसीकरण केंद्रांवर हे पोस्टर्स लावण्यात आले होते. डोलोचे नावही सर्व पोस्टर्सवर होते.

Web Title: why did this drug become popular in the era of corona such was the reason for the record breaking-sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.