पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झाची लस का द्यावी?... जाणून घ्या लक्षणं आणि बचाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:02 AM2021-06-23T11:02:25+5:302021-06-23T11:11:18+5:30

इन्फ्लूएन्झा/ फ्लू हा एका अत्यंत संसर्गजन्य आजार आहे जो मुलांच्या श्वासनलिकेवर आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि हा या वर्षी आढळलेल्या श्वसनाशी निगडीत असलेल्या अत्यंत सर्वसामान्य रोगांपैकी एक आहे.

Why all children should be vaccinated against influenza before monsoon? Know the symptoms and prevention | पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झाची लस का द्यावी?... जाणून घ्या लक्षणं आणि बचाव

पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झाची लस का द्यावी?... जाणून घ्या लक्षणं आणि बचाव

Next
ठळक मुद्देआपल्या मुलांना खोकला आणि पडसे होणे हा आयुष्याचा एक भाग झाला आहे. भारतामध्ये दरवर्षी 5 वर्षांखालील जवळपास 1 लाख मुलांना केवळ इन्फ्लूएन्झा/फ्लूच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते.

आरोग्य तज्ञ सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा(शीतज्वर)साठीची लस देण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा आहे. इन्फ्लूएन्झा(शीतज्वर) किंवा फ्लू आणि कोविड-19 च्या लक्षणांचे वर्चस्व वाढलेले असताना, तज्ञांना फ्लूच्या लसीमुळे मुलांचे संरक्षण होण्यास आणि पालकांमधील भीती नाहीशी होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो आहे.

अनेक पालकांना 'इन्फ्लूएन्झा(शीतज्वर) म्हणजे काय?', यामध्ये सर्वसामान्य सर्दीपेक्षा काय वेगळेपण आहे? आपण त्यापासून आपल्या मुलांचा बचाव करण्याचा विचार का केला पाहिजे? याविषयी शंका असू शकतात.

हा आजार आणि त्यापासूनचा बचाव यांविषयी काही बाबी आपल्याला ठाऊक असणे गरजेचे आहे. तीच माहिती येथे दिली आहे.

आजकाल आपल्या मुलांना खोकला आणि पडसे होणे हा आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. तरीही ताप, नाक बंद होणे आणि तापासारखी अन्य लक्षणे आढळून आल्यास मुले फ्लू म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या इन्फ्लूएन्झा(शीतज्वर) सारख्या एखाद्या अधिक धोकादायक आजाराचा धोका संभवतो.

इन्फ्लूएन्झा/ फ्लू हा एका अत्यंत संसर्गजन्य आजार आहे जो मुलांच्या श्वासनलिकेवर आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि हा या वर्षी आढळलेल्या श्वसनाशी निगडीत असलेल्या अत्यंत सर्वसामान्य रोगांपैकी एक आहे. 

जॉन हॉपकिन्सद्वारे आयोजित संशोधनामध्ये बऱ्याच मुलांना एका आठवड्यात बरे वाटू लागते, इतरांना गंभीर संसर्ग झालेला असू शकतो किंवा रुग्णालयीन सेवेची आवश्यकता असू शकते आणि त्याची परिणती फुफ्फुसाचा संसर्ग (न्यूमोनिया) किंवा अगदी मृत्यूमध्येही होऊ शकते असे आढळून आले आहे.

संशोधनांमधून असे कळून आले आहे की, भारतामध्ये दरवर्षी 5 वर्षांखालील जवळपास 1 लाख मुलांना केवळ इन्फ्लूएन्झा/ फ्लूच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते.[  डी पुरकायस्थ एत अल , जर्नल ऑफ ट्रॉपिकल पेडियाट्रिक्स, 2018, 64, 441-453]

याचा धोका कोणाला संभवतो?

इन्फ्लूएन्झा/ फ्लू कोणालाही होऊ शकतो. मात्र, हा आजार होण्याचा मोठा धोका असलेल्या व्यक्तींचे काही विशिष्ट गट आहेत, त्यामध्ये 6 महिन्याच्या बाळापासून ते 5 वर्षे वयापर्यंतची मुले, गर्भवती महिला, 65 वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या वृद्ध व्यक्ती, आरोग्य सेवांशी निगडीत कर्मचारी आणि मधुमेह, अस्थमा, कर्करोग, किंवा रोगप्रतिकारक शक्ती खालावणे, इ. प्रदीर्घ आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.

संक्रमण/प्रसार

याचा प्रसार प्रामुख्याने इन्फ्लूएन्झा/ फ्लूने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती शिंकताना किंवा बोलताना उडणाऱ्या तुषारांद्वारे होतो. म्हणूनच एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेले असता याच्या संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हवेत उडालेले तुषार हवेमध्ये 6 फुटांपर्यंत पसरू शकतात आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या इतरांपर्यंत पोहचतात.

लहान मुले किंवा रोगप्रतिकारकशक्ती खालावलेल्या व्यक्तींकडून दीर्घकाळापर्यंत याचे संक्रमण होऊ शकते त्यामुळे ते दीर्घकाळापर्यंत इतरांना संक्रमित करू शकतात. 

बचाव

या आजाराच्या उपचारांसाठी अनेक अँटीव्हायरल्स(अँटी इन्फ्लूएन्झा) औषधे उपलब्ध असली तरीही, हा आजार होऊ नये यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. साध्या आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांनी या आजाराचा प्रसार थांबवता येऊ शकतो. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत.

1.मुलांना खोकताना/ शिंकताना आपले तोंड व नाक झाकून घेण्यास शिकवणे.
2.नियमितपणे हात नेटकेपणाने धुणे. पाणी उपलब्ध नसल्यास सॅनिटायझर वापरणेही प्रभावी ठरते.
3.संक्रमित व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखणे आणि त्यांच्याशी थेट संपर्क टाळणे.
4.विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे.
5.इन्फ्लूएन्झा(शीतज्वर)साठीचे वार्षिक लसीकरण.

इन्फ्लूएन्झा(शीतज्वर)साठीचे वार्षिक लसीकरण हा इन्फ्लूएन्झापासून बचावासाठीचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. जागतिक आणि भारतीय आरोग्य तज्ञ 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना इन्फ्लूएन्झा(शीतज्वर)साठीचे वार्षिक लसीकरण करण्याचा आवर्जून सल्ला देतात.

आपल्याला हे माहिती आहेच की, इन्फ्लूएन्झा व्हायरसच्या विरोधातील प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत जाते आणि या पसरत जाणाऱ्या व्हायरसचे स्वरूप दरवर्षी बदलत असते तसेच ते लसीचेही बदलते म्हणून दरवर्षी लस घेतलीच पाहिजे. दरवर्षी इन्फ्लूएन्झासाठीची लस घेतल्याने आपल्या मुलाची प्रतिकारशक्ती तर वाढतेच पण संसर्गाचे पुढील संक्रमण रोखण्यासाठीही त्याची मदत होते.

इन्फ्लूएन्झा आजार आणि त्यापासून लसीकरणाद्वारे बचावाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

............

सूचना: GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited द्वारे जनहितार्थ लागू. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400 030, भारत. या सामग्रीमध्ये दिलेली माहिती ही केवळ सर्वसामान्य जनजागृतीसाठी आहे. या सामग्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला नाही. वैद्यकीय विषयातील शंका असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास किंवा आपल्या तब्येतीविषयी काही चिंता असल्यास आपल्या फिजीशियन(डॉक्टर)चे मार्गदर्शन घ्या. लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येण्याजोग्या आजारांची आणि प्रत्येक आजारासाठीच्या लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या बालरोगतज्ञांचे मार्गदर्शन घ्या. GSK च्या कोणत्याही उत्पादनामुळे प्रतिकूल घटना घडल्यास कंपनीला india.pharmacovigilance@gsk.com येथे कळवा.
CL code: NP-IN-FLT-OGM-210002, DoP Jun 2021

Web Title: Why all children should be vaccinated against influenza before monsoon? Know the symptoms and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.