थंडीच्या वातावरणात कोरोना इन्फेक्शन झालंय की सामान्य घसादुखी? 'असा' ओळखा फरक

By manali.bagul | Published: December 22, 2020 01:43 PM2020-12-22T13:43:40+5:302020-12-22T13:58:35+5:30

CoronaVirus News & Latest Updates : घसादुखी, सर्दी, खोकला झाल्यास लोकांच्या मनात सगळ्यात आधी कोरोनाची भीती येते. जेव्हापासून माहामारी पसरली तेव्हापासून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

What is the difference between random sore throat and covid sore throat | थंडीच्या वातावरणात कोरोना इन्फेक्शन झालंय की सामान्य घसादुखी? 'असा' ओळखा फरक

थंडीच्या वातावरणात कोरोना इन्फेक्शन झालंय की सामान्य घसादुखी? 'असा' ओळखा फरक

Next

एका वर्षाआधी घसादुखीचा त्रास होणं हे खूप सामान्य होतं. वातावरणातील बदलांमुळे सर्दी झाली, खोकला झाली तरी  लोक निश्चिंत असायचे. पण जसं नोव्हेल कोरोना व्हायरस संपूर्ण देशात पसरला तसं लोकांच्या मनात भीती पसरली आहे. घसादुखी, सर्दी, खोकला झाल्यास लोकांच्या मनात सगळ्यात आधी कोरोनाची भीती येते.  जेव्हापासून  माहामारी पसरली तेव्हापासून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. घश्यातील सामान्य वेदना की घसादुखी यातील फरक कसा ओळखायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

घश्यातील वेदनांची सामान्य कारणं

घश्यात वेदना होणं हे खूप सामान्य आहे. श्वसन प्रणालीची एलर्जी, इन्फेक्शन घसादुखीचे कारण ठरू शकते.  डॉक्टर दिपेश महेंद्र यांनी सांगितले की, श्वसनप्रणालीवर आक्रमण करत असलेल्या व्हायरसेसमध्ये इनफ्लुएंजा व्हायरस, ऐप्सटीन, एडिनोव्हायरस यांचा समावेश आहे. कधी कधी घश्यातील वेदना, एलर्जी, सुका खोकला एअर कंडिशनिंगमुळे होतात. प्रदूषणामुळे हवेत आढळणारे धुळीचे कण, तंबाखूचे सेवन यांमुळे गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लेक्सचे असे आजार होऊ शकतात. फ्लू, स्ट्रेप्टोकोकल व्हायरस आणि कोविड १९ मुळे होत असेलेल्या समस्यांमध्ये समानता दिसून येते. यासगळ्या प्रकारच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजणं, मासपेशींतील वेदना , शरीरातील वेदना, डोकेदुखी आणि थकवा यांचा समावेश आहे. 

१) डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लूच्या लक्षणांची खासियत म्हणजे फ्लूची लक्षणं वेगाने जाणवतात आणि उपचारांनंतर लगेच प्रभाव कमी होऊ लागतो. कोरोनाची लक्षणं तुलनेने कमी वेगाने दिसून येतात. अनेकदा तीव्रतेनेही दिसून येतात. 

२)  ज्या व्यक्तीला सामान्य घश्याचा त्रास आहे. त्यांना घश्यात वेदना होणं, खाज येणं, गिळायला त्रास होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे सुजलेले टॉन्सिन्स लाल होतात. घश्याच्या समोरील लिंफ नोड सुजलेले असतात. त्यामुळे त्रास वाढतो.

आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

३) तुमच्या टॉन्सिल्सवर पांढऱ्या रंगाचे पॅच येऊ शकतात. त्यामुळे आवाज बसू शकतो. पण घश्यातील सामान्य  समस्यांमुळे कफ किंवा छातीत दुखण्याची समस्या उद्भवत नाही. भारतात १० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड १९ च्या इन्फेक्शच्या केसेसमध्ये अशी लक्षणं दिसून आली आहेत.

कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन नेमका आला कुठून? कितपत जीवघेणा ठरणार? तज्ज्ञ सांगतात की...

४) भारतात १० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड १९ च्या इंफेक्शन्समध्ये दिसून आलं  की, घश्यात खाज येणं, जखम झाल्याप्रमाणे भसतं. पण यातील फरक ओळखता येऊ शकतो कारण वाढते लिंफ नोड आणि सुजलेले टॉन्सिल्स, श्वासांची दुर्गंधी आणि खराब आवाज साधारणपणे कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिसून येत नाही. 

कोरोनाची लक्षणं

आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्रासाचा सामना करावा लागत असेल तसंच वास घेण्याची क्षमता, चव नाहीशी झाली आहे तर त्यापैकी एक लक्षणे देखील दर्शविते की आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो.  केवळ घसा खवखवणे हे दर्शवित नाही की आपल्यला कोरोना झाला आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, हवामानातील बदल आणि फ्लूमुळे  देखील घशात वेदना आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. 

Web Title: What is the difference between random sore throat and covid sore throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.