'या' वयातच वाढलेलं वजन कमी करा; अन्यथा गंभीर आजारांसह मृत्यूचा वाढेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:22 PM2020-09-02T14:22:17+5:302020-09-02T14:32:41+5:30

रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार हायपरटेंशन, डायबिटिस आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी लठ्ठपणाचं प्रमाण कमी व्हायला हवं.

Weight Loss Tips Marathi : Study said control your weight on early age read | 'या' वयातच वाढलेलं वजन कमी करा; अन्यथा गंभीर आजारांसह मृत्यूचा वाढेल धोका

'या' वयातच वाढलेलं वजन कमी करा; अन्यथा गंभीर आजारांसह मृत्यूचा वाढेल धोका

Next

आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी दिनक्रम चांगला असणं गरजेचं आहे. चांगला आहार घेण्यासोबतच मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि योगा करणं गरजेचं आहे. अलिकडे संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लठ्ठपणाला कमी केल्यास चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार हायपरटेंशन, डायबिटिस आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी लठ्ठपणाचं प्रमाण कमी व्हायला हवं.

संशोधकांना या रिसर्चमधून दिसून आलं की अमेरिकेत १२.४ टक्के लोकांचा मृत्यू वेळेआधीच झाला. लवकर मृत्यू होत असलेल्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स जास्त होता. वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर त्यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वजन कमी करून वेळेआधी होत असलेल्या मृत्यूला टाळता येऊ शकतं. जामा नेटवर्क ओपनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 

यानुसार मध्यम वयात वजन कमी केल्यास तुलनेनं मृत्यूदर कमी दिसून येतो. २५ वयात कमी केल्यानं मृत्यूचा धोका ५४ टक्क्यांनी कमी होतो. लठ्ठपणाला सुरूवातीच्या काळात नियंत्रणात ठेवण्यास निर्माण होत असलेल्या समस्या टाळता येऊ शकतात. सध्याच्या तरूण पिढीत वजन वाढण्याची समस्या जास्त उद्भवत आहे. पौष्टिक खाणं, व्यायाम करणं शरीराला नेहमी हायड्रेट ठेवणं यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. 

वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करणं असो अथवा वाढवणं असो. या स्थितीत तुम्हाला डाएट खूप महत्वाचं असतं.  त्यासाठी व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असतं. त्यासाठी फळं, ताज्या भाज्या, गरम पाणी, लिंबू यांचा आहारात समावेश करा. रोजच्या कामामुळे वेळेचा अभाव आणि थकवा आल्यामुळे आपली झोप पुर्ण होत नाही. ७ ते ८  तास झोप घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे राहत  असाल तर  तुमचं पोट जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगली झोप घेणं आवश्यक आहे. कारण झोप झाली नाही तर हार्मोनल इंबॅलेन्स होण्याची शक्यता असते.

योगा करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं. रोज पोट कमी करण्यासाठी तुम्ही ठरावीक पद्धतीने योगा कराल कर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.  तुम्हाला जीमला जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. घरच्याघरी मॅट घालून तुम्ही योगा करू शकता. अल्कोहोलचं सेवन केल्यानंतर शरीरातील मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यात मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त या पदार्थाचं सेवन केल्यास  लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे  मादक पदार्थांचे सेवन करू नका. 

साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेटाबॉलिज्म मंद गतीने होतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. इतकंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला गोड खावसं वाटत असेल तर फळांचा आहारात समावेश करा. जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. असे चरबी वाढवणारे पदार्थ टाळा.

हे पण वाचा-

चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना

नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल

खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात

Web Title: Weight Loss Tips Marathi : Study said control your weight on early age read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.