For weight loss start your day with fiber and protein breakfast | वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात
वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात

जर तुम्हाला कुणी विचारलं की वजन कमी करण्यासाठी काय करावं? तर साधारणपणे तुमचं हेच उत्तर असेल की, एक्सरसाइज करा, रनिंग करा, डायटिंग करा. हे सगळं आहेच पण लठ्ठपणा आणि तुमच्या आहाराचा खोलवर संबंध असतो. तुम्ही काय खाता, कधी खाता आणि किती खाता याचा सर्व गोष्टींचा तुमच्या वजनावर थेट प्रभाव पडतो. चांगल्या आहाराचा विषय निघतो सकाळचा नाश्ता अधिक महत्त्वाचा ठरतो. अशात नाश्त्यात काय खावं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात काय खावं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचा समावेश

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, ब्रेकफास्टमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असलेले पदार्थ असावेत. याने भूक कमी लागते आणि पोट भरलेलं राहतं. 2012 मध्ये ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, डायट्री प्रोटीनमुळे लठ्ठपणा कमी करणे आणि मेटाबॉलिज्म रेटची समस्या ठीक करण्यास मदत मिळते. कारण याने तुम्हाला भूक जास्त जाणवणार नाही. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थांचा समावेश करावा.

केळं आहे फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही केळी आवर्जून खाल्ली पाहिजेत. एका केळ्यात 3 ग्रॅम फायबर आणि केवळ 100 कॅलरी असतात. त्यामुळे केळ्याटा वजन कमी करण्यासाठी फायदाच होतो. केळी खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि भूकही कंट्रोल होते. डेली फायबर इन्टेकचा 12 टक्के भाग तुम्हाला केळ्यातूनच मिळू शकतो.

फायबर असलेले ओट्स

ओट्समध्ये विरघळणारं फायबर असतं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासही मदत करतं. तसेच हे विरघळणारं फायबर आतड्यांच्या संक्रमणापासून बचाव करतं. ओट्समध्ये बीटा ग्लूटेन सुद्धा असतं, हे एक लिपिड काम करणारं एजेंट. त्यामुळे नाश्त्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्स तुम्ही फळांसोबत एकक्ष करूनही खाऊ शकता.

प्रोटीनचं स्त्रोत अंडी

नाश्त्यात अंडी खाणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. याने शरीराची स्टॅमिना वाढतो. तसेच अंड्यात प्रोटीन भरपूर असल्याने मसल्सही मजबूत होतात. त्यामुळे नाश्त्यात रोज अंडी खावीत.

दही खाऊन वजन करा कमी

100 ग्रॅम दह्यात साधारण 3.5 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे याने पोट भरलेलं राहतं. तसेच दह्याने कॅलरी सुद्धा कमी केल्या जातात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. दह्यात अमीनो अॅसिड असतं. जे सहजपणे पटतं.


Web Title: For weight loss start your day with fiber and protein breakfast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.