ही लक्षणे दिसली तर समजा तुमच्या फुप्फुसात भरलंय पाणी, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:23 AM2022-10-04T11:23:24+5:302022-10-04T11:24:01+5:30

Water in lungs: अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वासनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येते.

Water in lungs or pulmonary edema causes symptoms treatment | ही लक्षणे दिसली तर समजा तुमच्या फुप्फुसात भरलंय पाणी, जाणून घ्या उपाय

ही लक्षणे दिसली तर समजा तुमच्या फुप्फुसात भरलंय पाणी, जाणून घ्या उपाय

googlenewsNext

Water in lungs: अनेकदा फुप्फुसांमध्ये किंवा छातीत पाणी भरतं. ज्याला मेडिकल भाषेत पल्मोनरी एडिमा म्हणतात. ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वासनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येते.

फुप्फुसात पाणी भरण्याची कारणे

मेयो क्लीनिकनुसार, फुप्फुसात पाणी भरण्याचं मोठं कारण हृदयरोग आहे. पण इतरही काही कारणांमुळे फुप्फुसात पाणी भरतं. निमोनिया, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे, काही औषधं, छातीवर आघात होणे आणि उंचावर चढणे किंवा एक्सरसाइज करतानाही फुप्फुसात पाणी जाऊ शकतं.
फुप्फुासात पाणी भरण्याच्या स्थितीला मेडिकल इमरजन्सी मानलं गेलं आहे. ज्यासाठी लगेच उपचाराची गरज असते. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने रूग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. 

फुप्फुसात पाणी भरल्याची लक्षणे

फुप्फुसात पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास, कफातून रक्त येणे, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा थंड होणे, श्वास घेताना धाप लागणे, थकवा, अस्वस्थता, चिंता, पाय आणि शरीराच्या इतर भागावर सूज येणे यांचा समावेश आहे.

इतर काही लक्षण

- खोकला

- जास्त घाम येणे

- चिंता व अस्वस्थता

- घाबरल्यासारखं वाटणे

- त्वचा पिवळी पडणे

- श्वास घेताना अडचण

- हृदयाचे ठोके वाढणे

- छातीत दुखणे

- सपाट झोपल्यावर श्वास घेण्यास अडचण

- पायांवर सूज

काय आहेत उपाय

mayoclinic च्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हेल्दी डाएट घेतली पाहिजे. तुम्ही आहारात ताजी फळं, हिरव्या भाज्या, नट्स, शेंगा, दूध, केळी, बिया यांचा समावेश केला पाहिजे.

सोडियमचं सेवन कमी करा

शरीरात जास्त प्रमाणात मीठ असेल तर याने जास्त तरल पदार्थ तयार होतात. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मिठाचं सेवन कमी करा. आपल्या जेवणात मिठाऐवजी काळे मिरे, लसूण, लिंबाचा रस आणि इतर साध्या मसाल्यांचा समावेश करा. 

स्मोकिंग सोडा

स्मोकिंग करणं टाळा. कारण या स्थितीत समस्या आणखी गंभीर होऊ शकते. इतकंच नाही तर तुम्हाला सेकंड हॅंड धुरापासूनही बचाव केला पाहिजे. वातावरणाची अॅलर्जीपासून बचाव करा. कारण याने तुमच्या फुप्फुसात जळजळ होऊ शकते.

मद्यसेवन सोडा

मद्यसेवन आणि इतर नशेच्या पदार्थांच सेवन बंद करा. याने पल्मोनरी एडिमा समस्या होऊ शकते. यामुळे समस्या आणखी गंभीर होऊ शकते. ही समस्या होऊ द्यायची नसेल तर लगेच मद्यसेवन बंद करा.

जास्त फिजिकल अॅक्टिविटी टाळा

जास्त फिजिकल अॅक्टिविटी केल्याने पल्मोनरी एडिमाची लक्षणे आणखी बिघडू शकतात. जर तुम्ही काही जड काम करत असाल तर तुम्ही तुमच्या श्वसन तंत्राला आराम देण्यासाठी दर एका तासाने छोटा ब्रेक घ्या.

Web Title: Water in lungs or pulmonary edema causes symptoms treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.