सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत  कमी वयातसुद्धा हाडं कमकुवत होत जातात. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारांचं शिकार व्हावं लागतं. हाडं कमजोर झाल्यानंतर बसण्या उठण्यास त्रास होण्यापासून अनेक आजारांचा सामना करावा लागतो.  आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही आयुष्यभर आपल्या हांडांना चांगलं ठेवू शकता. 

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स हाडांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होतं. हार्वर्डमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार १६ ते २० या वयोगटातील लोकांना सॉफ्ट ड्रिंकचं जास्त सेवन केल्यामुळे हाडांच्या आजारांचा सामना करावा लागतो. संतुलित आहाराचा अभाव आणि जंक फुडचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे  शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. 

प्रोटिन्स जास्त घेणं

गरजेपेक्षा जास्त प्रोटीन्स घेतल्यामुळे शरीरात एसिडीटी वाढू शकते. त्यामुळे मुत्रमार्गाने शरीरातील कॅल्शियम बाहेर निघते. दिवसभरातून आहारात अंडी, भाज्या,डाळी अशा विविध पदार्थातून प्रोटिन्स मिळत असतात. 

कॅफिनचं कमी सेवन

कॅफिनच्या अतिसेवनाने शरीरातील कॅल्शियम बाहेर पडत असता. त्यासाठी चहा, कॉफी, अशा पदार्थांचे सेवन टाळा. दुधाचं सेवन करू शकता. दुधामध्ये प्रोटीन,व्हिटॅमिन ए आणि डी देखील मुबलक प्रमाणात असते. बकरीच्या  दूधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आढळते.

हाडांच्या मजबूतीसाठी नियमित व्यायाम, आहारामध्ये नियमित सॅलॅड, पालेभाज्या, सूप याचा वापर करायला हवा. अंडी, मासे, हाडांचे सूप हेही हाडांच्या आजारावर अतिशय उपयोगी आहार आहेत. याचबरोबर किमान एक चमचा तरी तूप पोटात जायला हवे.  तसंच महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजनचा साठा कमी होतो परिणामी घनताही कमी होते. थायरॉइड ग्रंथीच्या विकारामध्येही हाडे ठिसूळ होऊ  शकतात. काही विकारांमध्ये स्टिरॉइड देणे आवश्यक असते.

म्हणून सुरूवातीपासूनच व्यायाम आणि आहार चांगला घेणं गरजेचं आहे. डाळी  आणि कडधान्ये कॅलशियमचा एक उत्तम स्त्रोत आहेत.  शिवाय यांच्यामध्ये फायबर,प्रोटिन्स,मायक्रो न्युट्रिएंट्स, लोह, झिंक, फॉलिक, पोटॅशियमदेखील भरपूर असतात. त्यासाठी आहारात डाळींचा समावेश करा.

Web Title: Useful tips to keep bones strong and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.