हेल्दी हार्टसाठी फायदेशीर ठरतात 'या' 5 एक्सरसाइज; हाय ब्लड प्रेशरची समस्या होते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:38 PM2019-09-30T13:38:00+5:302019-09-30T13:38:52+5:30

अनेकजण हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयासंबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं.

These 4 exercise can control high blood pressure and heart disease | हेल्दी हार्टसाठी फायदेशीर ठरतात 'या' 5 एक्सरसाइज; हाय ब्लड प्रेशरची समस्या होते दूर

हेल्दी हार्टसाठी फायदेशीर ठरतात 'या' 5 एक्सरसाइज; हाय ब्लड प्रेशरची समस्या होते दूर

Next

(Image Credit : saga.co.uk)

अनेकजण हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयासंबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवरच अवलंबून राहू नका. कारण औषधांचं जास्त सेवनही आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी करण्यासाठी काही एक्सरसाइजचा आधार घेऊ शकता. ही एक्सरसाइज हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते आणि हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं. या एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. कारण या एक्सरसाइज तुम्ही अगदी सहज घरच्या घरी करू शकता.


 (Image Credit : Meritage Medical Network)

कार्डियो एक्सरसाइज

कार्डियो एक्सरसाइज आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. कार्डियो एक्सरसाइज आपल्या हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर एक्सरसाइज समजली जाते. कारण शरीरातील रक्तप्रवाह वाढविण्यासाठी ही एक्सरसाइज मदत करते. कार्डियो एक्सरसाइज केल्याने मोठ्या प्रमाणावर कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर कार्डिओ एक्सरसाइज करणं फायदेशीर ठरतं. परंतु, लक्षात ठेवा ती जोरात चालणं, दोरीच्या उड्या मारणं, स्विमिंग, सायकल चालवणं किंवा जंपिंग जॅक अशा हलक्या कार्डिओ एक्सरसाइज करा.

(Image Credit : heart.org)

स्ट्रेंथ ट्रेनिंग

स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंसाठी आणि हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने मोठ्या प्रमाणावर कॅलरी बर्न होतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्ती स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात. 

(Image Credit : www.self.com)

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग केल्याने शरीर लवचिक होण्यास मदत होते. स्ट्रेचिंग पाठ आणि कंबरेच्या वेदना कमी होतात. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी स्ट्रेचिंग करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. स्ट्रेचिंग केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतं. परंतु, स्ट्रेचिंग करण्याआधी स्ट्रेचिंगचे प्रकार, तीव्रता आणि वेळ समजून घ्या. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडूनही सल्ला घेऊ शकता. 

पायऱ्या चढणं

ब्लड प्रेशर कमी आणि हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, पायऱ्या चढणं आणि उतरणं. यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅलरी बर्न होण्यास मदत होते. याचा थेट परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे लिफ्टचा वापर कमी करा आणि पायऱ्यांचा वापर करा. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: These 4 exercise can control high blood pressure and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.