रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:56 PM2022-05-13T17:56:09+5:302022-05-13T18:00:01+5:30

उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या.

There is a lot of damage to the eyes in the scorching sun, take care of this before it has a fatal effect | रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

googlenewsNext

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. उष्ण वाऱ्यात घराबाहेर पडतानाही शंभर वेळा विचार करावा लागतो. उष्माघातासारख्या प्रकारासोबतच कडक उन्हाचा डोळ्यांवरही घातक परिणाम होतो. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांना डोळे कोरडे होणे, डोळ्यात वेदना, अ‌ॅलर्जी, डोळ्यात बोचणे, कॉर्नियाच्या समस्या इत्यादींचा त्रास होतो. उन्हाळ्यात अति उष्ण वारे आणि हानिकारक अतिनील किरणांमुळे डोळ्यांचा कॉर्निया (Cornea Burn) जळण्याचीही शक्यता असते. यामुळे अस्पष्ट दृष्टी, डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या.

उष्ण वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याचे उपाय

सनग्लासेस लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका -
TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ज्याप्रमाणे त्वचेसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे डोळ्यांनाही उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक कवच आवश्यक आहे. दिवसा घराबाहेर पडल्यास डोळे कोरडे होणे, कॉर्निया जळणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस घाला. हानिकारक अतिनील किरण डोळ्यांना नुकसान करतात, ज्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात.

भरपूर द्रव पदार्थ पिणे सुरू ठेवा -
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्रवपदार्थाचे सेवन करणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्रवपदार्थाचा जास्त वापर करणे देखील चांगले असते. उन्हाळ्यात डोळ्यांतील टियर फिल्मचे बाष्पीभवन होत असल्याने डोळ्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. अतिरिक्त अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन देखील या दिवसात टाळले पाहिजे कारण यामुळे निर्जलीकरण वाढू शकते.

डोळ्यात थेंब टाका -
हायड्रेटेड राहण्यासोबतच उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये आय ड्रॉप्स टाकणेही गरजेचे आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा (lubricated) कायम राहतो. डोळ्यांच्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आय ड्रॉप्स खरेदी करा आणि त्यांचा नियमित वापर करा. उष्ण वाऱ्यामुळे डोळे कोरडे होतात, अशा परिस्थितीत आय ड्रॉप्स वापरल्याने कोरडेपणा, खाज सुटणे, जळजळ यासारख्या समस्या होणार नाहीत.

डोळ्यांजवळ सनस्क्रीन लावू नका -
उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त काळजी घेण्यासाठी आणि त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावत असाल, तर लक्षात ठेवा की ते डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर, पापण्यांच्या भागावर लावू नये. कारण, सनस्क्रीनमध्ये एसपीएफचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे डोळ्यांना हानी पोहोचते.

दुपारी बाहेर जाताना -

दिवसा 11 ते 4 वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नका. महत्वाच्या कामांसाठी जावं लागत असेल तर छत्री, चष्मा, स्कार्फ, पाणी अशा सर्व गोष्टी सोबत ठेवा. जास्त वेळ उन्हात फिरण्याऐवजी सावलीत बसा. हा असा काळ आहे जेव्हा सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरणे अत्यंत तीव्र आणि हानिकारक असतात.

Web Title: There is a lot of damage to the eyes in the scorching sun, take care of this before it has a fatal effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.