हँडवॉश निवडताना घ्या 'ही' काळजी, कोरोना आसपास देखील फिरकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:13 PM2021-07-29T16:13:50+5:302021-07-29T16:14:27+5:30

करोना व्हायरसने जगभरात घातलेले थैमान तुम्हाला माहितीच आहे. या पार्श्वभूमीवर आता हात धुण्यासाठी योग्य हँडवॉश कसा निवडावा यासाठीच्या टिप्स...

Take care when choosing a handwash, in corona period, use these simple tips | हँडवॉश निवडताना घ्या 'ही' काळजी, कोरोना आसपास देखील फिरकणार नाही

हँडवॉश निवडताना घ्या 'ही' काळजी, कोरोना आसपास देखील फिरकणार नाही

Next

निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्याची योग्य पद्धतीने देखभाल करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले हात योग्य पद्धतीने स्वच्छ ठेवल्यास कित्येक गंभीर संसर्ग स्वतःपासून दूर ठेवता येऊ शकतात. करोना व्हायरसने जगभरात घातलेले थैमान तुम्हाला माहितीच आहे. या पार्श्वभूमीवर आता हात धुण्यासाठी योग्य हँडवॉश कसा निवडावा यासाठीच्या टिप्स...

बॅक्टेरिया मारणारा
हँडवॉश निवडताना हा बॅक्टेरियांना मारु शकतो का? हा पहिला प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाला पाहिजे. आपल्या हातांवर जर बॅक्टेरिया असतील तर त्यांचे संक्रमण कान, डोळे अथवा तोंडाला हात लावल्यामुळे होते. त्यामुळे असा हँडवॉश निवडावा ज्यामुळे हातावरील बॅक्टेरिया मरून जातील.

उत्तम सुगंध
सुगंधाचा आपला मुड बदलण्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे सुगंधी तेल, फळ अथवा पानांचा वास असलेला हँडवॉश निवडा. त्याच्या वापराने तुमचा मुडही उत्तम राहिल.

त्वचेला पोषण देणारा
हँडवॉश फक्त स्वच्छता राखण्याचे काम नाही करत तर अशुद्धता पण दूर करतो. असा हँडवॉश निवडा जो तुमच्या त्वचेला मुलायम बनवेल आणि पोषण देईल. हँडवॉशमध्ये योग्य पोषणद्रव्ये असली तर ती तुमची त्वचा मॉश्चराईज आणि कोमल बनवतात. त्यामुळे असा हँडवॉश निवडा ज्यात हायड्रेटिंग गुण असतील. ते तुमच्या हातांनाच साफ बनवणार नाहीत तर त्यांना नरम आणि कोमलही बनवतील.

हात धुणे का महत्वाचे आहे?
सध्याच्या काळात हातांची स्वच्छता, चेहऱ्याला वारंवार स्पर्श न करणे, अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात धुणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे; याचे महत्त्व करोना व्हायरसच्या (Coronavirus Infection) प्रादुर्भावामुळे लोकांना समजले आहे. योग्य पद्धतीने हात धुतल्यास करोना व्हायरससारख्या महामारीपासून आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळेल.

Web Title: Take care when choosing a handwash, in corona period, use these simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.