कानाला आली होती सूज म्हणून डॉक्टरकडे गेला, जे दिसलं ते पाहून डॉक्टरही झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:53 AM2019-11-28T10:53:58+5:302019-11-28T11:00:19+5:30

अलिकडे लोक बारीक-सारीक समस्या दूर करण्यासाठी लोक इंटरनेटची मदत घेतात. पण ते याचा विचार अजिबात करत नाहीत की, इंटरनेटवर दिली जाणारी माहीत ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय फॉलो करायची नसते.

Swollen ear internet treatment garlic clove in ear | कानाला आली होती सूज म्हणून डॉक्टरकडे गेला, जे दिसलं ते पाहून डॉक्टरही झाले हैराण!

कानाला आली होती सूज म्हणून डॉक्टरकडे गेला, जे दिसलं ते पाहून डॉक्टरही झाले हैराण!

Next

(Image Credit : medicalnewstoday.com)(प्रातिनिधीक छायाचित्र)

अलिकडे लोक बारीक-सारीक समस्या दूर करण्यासाठी लोक इंटरनेटची मदत घेतात. पण ते याचा विचार अजिबात करत नाहीत की, इंटरनेटवर दिली जाणारी माहीत ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय फॉलो करायची नसते. मग काय अनेकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. असंच काहीसं चीनमधील एका व्यक्तीसोबत झालं.

कांगे नावाची एक व्यक्ती कानात दुखत असल्यामुळे डॉक्टरकडे गेली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांना कांगेच्या डाव्या कानात पांढऱ्या रंगाचं काहीतरी असल्याचं दिसलं.

(Image Credit : quora.com)

डॉक्टरांना वाटलं की, कांगेच्या कानात इन्फेक्शन झालं आहे. आणि त्यामुळे त्याच्या कानात सूज आली आहे. पण उपचारादरम्यान कांगेने नंतर डॉक्टरांना जे सांगितलं ते वाचून डॉक्टरही हैराण झाले.

(Image Credit : businessinsider.com)

कांगेने सांगितले की, त्याने इंटरनेटवर वाचलं होतं की, लसणात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी तत्व असतात आणि लसूण कानात ठेवल्याने कानासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.

कानातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी कांगे ने कानात लसूण टाकला खरा, पण दोन महिने लसूण कानातच अडकून राहिला. इतके दिवस लसूण कानातच राहिल्याने लसणाच्या वासामुळे कांगेला सतत डोकेदुखी होत होती आणि कानातही वेदना वाढल्या होत्या.

(Image Credit : Social Media)

अखेर वेदना असह्य झाल्यावर कांगेने डॉक्टरकडे धाव घेतली. डॉक्टरांनी कांगेच्या कानात दोन महिन्यांपासून अडकलेला लसूण काढला आणि कानातील सूज कमी होण्यासाठी त्याला औषधही दिले. तसेच डॉक्टरांनी त्याला सूचनाही केली आहे की, यापुढे इंटरनेटवर वाचून कोणत्याही आजारावर उपचार करू नकोस.


Web Title: Swollen ear internet treatment garlic clove in ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.