रोज काहीना काही विसरण्याचं प्रमाण वाढलंय का? रोज हे सोपं काम करून दूर करा समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:06 AM2019-07-22T10:06:25+5:302019-07-22T10:12:37+5:30

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण नेहमीच ऐकत असतो. सोबतच अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे जगभरात वजन वाढण्याची समस्याही वेगाने वाढत आहे.

Study says walking 8900 steps a day could lower risk of Alzheimer | रोज काहीना काही विसरण्याचं प्रमाण वाढलंय का? रोज हे सोपं काम करून दूर करा समस्या

रोज काहीना काही विसरण्याचं प्रमाण वाढलंय का? रोज हे सोपं काम करून दूर करा समस्या

Next

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण नेहमीच ऐकत असतो. सोबतच अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे जगभरात वजन वाढण्याची समस्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोक हैराण आहेत. बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या स्मरणशक्ती आणि व्यवहारातही फरक बघायला मिळत आहे. हीच कमी होणारी स्मरणशक्ती आणि बदलता व्यवहार, बदलती वागणूक रोखण्यासाठी रोज हलकी एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

(Image Credit : Adelaide Hills)

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी दावा केला आहे की, रोज ८ हजार ९०० पावले चालल्याने अल्झायमरची समस्या कमी केली जाऊ शकते. हा निष्कर्ष १८१ लोकांवर अभ्यास करून काढण्यात आला.

अल्झायमर प्रोटीनचा एक्सरसाइजशी संबंध

जामा न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, असे लोक ज्यांची स्मरणशक्ती वेगाने कमी होत आहे त्यांच्यासाठी रोज वॉक करणे फायदेशीर ठरतो. वेगाने कमी होणारी स्मरणशक्ती म्हणजेच अल्झायमर एक वाढत्या वयातील आजार आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, ही स्थिती मेंदूमध्ये एमिलॉयड बीटा नावाच्या एका प्रोटीनचं प्रमाण वाढल्याने येते.

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलचे प्रा. डॉ. जसमीर चटमाल यांच्यानुसार, शारीरिक हालचाल करून स्मरणशक्ती सुधारण्यासोबतच ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, स्मोकिंग, डायबिटीज धोका कमी केला जाऊ शकतो. या रिसर्चमध्ये सहभागी १८२ लोकांची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची, समझण्याची क्षमता याची गेल्या सात वर्षात दोनदा टेस्ट करण्यात आली होती. शारीरिक हालचालीने स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पावलांवर नजर ठेवण्यासाठी पेडोमीटर घातलं गेलं आणि ७ दिवस रोज पायी चालण्याचा प्रभाव बघायला मिळाला.

(Image Credit : Reader's Digest)

रिसर्चमध्ये सहभागी सर्वच लोकांच्या मेंदूचा स्कॅन करून एमिलॉयड प्रोटीनचं प्रमाण पाहिलं गेलं. संशोधकांनुसार, याआधीही काही रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे की, एक्सरसाइजने या प्रोटीनचं प्रमाण वाढणं रोखलं जाऊ शकतं. असे लोक जे सक्रिय आहेत, एक्सरसाइज करतात त्यांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कमतरता आढळली नाही आणि त्यांच्यात एमिलॉयड बीटा प्रोटीनही नियंत्रित आहे. 

Web Title: Study says walking 8900 steps a day could lower risk of Alzheimer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.