'या' उपायांनी ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही केली मात; भारतातही अशाच पद्धतीनं कोरोनाला हरवता येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:41 PM2021-04-25T14:41:12+5:302021-04-25T21:00:30+5:30

CoronaVirus News : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे दररोज 60 ते 67 हजार रुग्ण आढळले होते. 20 जानेवारी रोजी येथे सर्वाधिक 1823 रुग्णांचा मृत्यू झाला.

Story how britain defeated second wave of coronavirus know everything about it | 'या' उपायांनी ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही केली मात; भारतातही अशाच पद्धतीनं कोरोनाला हरवता येणार? 

'या' उपायांनी ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही केली मात; भारतातही अशाच पद्धतीनं कोरोनाला हरवता येणार? 

Next

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. परंतु ब्रिटनची दुसरी लाटही अत्यंत धोकादायक होती, ज्यामध्ये ब्रिटन यशस्वी झाला आहे. आज ब्रिटन हा जगातील अशा काही मोठ्या देशांपैकी एक आहे, जेथे जलद गतीनं संसर्ग कमी होऊ लागला आहे. ब्रिटन ज्या पद्धती अवलंबण्यात यशस्वी झाले. भारतानेही ब्रिटनच्या मार्गाचा अवलंब केला तर कोरोनाचा पराभव होऊ शकतो का? यााबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

ब्रिटनच्या दुसर्‍या लाटेमागील कारण नवीन कोरोना व्हेरिएंट बी 117 होते. कोरोना विषाणूच्या अनुवांशिक घटकांमधील बदलांमुळे या प्रकाराचा विकास होऊ लागला, जो 70 टक्के अधिक संसर्गजन्य होता. डिसेंबरपर्यंत, या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांपैकी एकट्या लंडनचाच वाटा आहे. या प्रकारासह कोरोना विषाणू भारत, अमेरिका, आफ्रिका आणि अमेरिकेतही पसरला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे दररोज 60 ते 67 हजार रुग्ण आढळले होते. 20 जानेवारी रोजी येथे सर्वाधिक 1823 रुग्णांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या म्यूटेशननंतर कोरोना झपाट्याने पसरल्यामुळे दुसरी लहर भारतात शक्तिशाली बनली आहे. ब्रिटनमध्ये दुसर्‍या लाटेला कारणीभूत ठरणारा प्रकार म्हणजे 23 म्यूटेशन्ससह कोरोना व्हायरस. तथापि, यावर नियंत्रण ब्रिटनने  ठेवण्यासाठी काही निर्बंधही लागू होते.

१) लॉकडाऊन

जानेवारीच्या सुरुवातीस येथे कडक राष्ट्रीय लॉकडाऊन केला गेला. दररोज 60 हजाराहून अधिक रुग्ण समोर येत होते आणि मृत्यूंमध्ये 20% वाढ झाली होती. या लॉकडाऊनच्या तीन महिन्यांनंतर आता दैनंदिन प्रकरणे कमी झाली असून ती 3 हजारांपेक्षा अधिक कमी झाली आहे.

२) वेगानं लसीकरण

लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारने लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत वाढविला. यामुळे  पहिल्या लसीच्या वेगवान विकासामुळे लोकांची संक्रमणशी लढण्याची क्षमता तात्पुरती विकसित करण्यात मदत झाली. येथे  63.02 लोकांना  लोकांना डोस मिळाला, ज्यामुळे मृत्यूची संख्या ९५ टक्क्यांपर्यंत कमी झाली.

३) रुग्ण पडताळणी

लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलचे एमडी डॉ. निशित सूद म्हणाले की, रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता येण्याची परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णालयातील व्यवस्थापकांनी फक्त सर्वात गंभीर रूग्ण भरती करण्याचा नियम बनविला. कोणत्याही व्यक्तीला बेड किंवा व्हेंटिलेटर देण्यासारख्या गोष्टींचा निर्णय घेतल्यास त्याचे कडक निरीक्षण केले जाते. त्यांचे म्हणणे आहे की, 99 टक्के रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत. अशा स्थिती गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी बेड्स राखून ठेवायला हवेत. 

४) नियमांचे पालन

कोविड प्रोटोकॉलचे अत्यंत काटेकोर पालन करण्यासाठी मास्क न वापरल्याबद्दल सरकारकडून जोरदार दंड आकारला जात आहे. मोकळ्या जागांवरही मुलांसह सहापेक्षा जास्त लोकांना एकत्र उभे राहण्यास बंदी घालण्यात आली होती. बार-रेस्टॉरंट इ. पूर्णपणे बंद होते. तसेच एकदा पॉझिटिव्ह अहवाल आला की संसाधन वाया जाऊ नये म्हणून पुन्हा अहवाल दिला जात नव्हता. 

Web Title: Story how britain defeated second wave of coronavirus know everything about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.