'ही' 3 असू शकतात पोट दुखण्याची कारणं; पण बऱ्याचदा लक्षात येत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:18 AM2019-10-16T11:18:07+5:302019-10-16T11:19:23+5:30

पोटदुखीची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. पोटदुखी पोटाशी निगडीत समस्यांचं एक लक्षणदेखील असू शकतं.

stomach allergy constipation and too much of citric fruits can be a reason of stomach ailments | 'ही' 3 असू शकतात पोट दुखण्याची कारणं; पण बऱ्याचदा लक्षात येत नाहीत

'ही' 3 असू शकतात पोट दुखण्याची कारणं; पण बऱ्याचदा लक्षात येत नाहीत

googlenewsNext

(Image Credit : Medical News Toda)

पोटदुखीची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. पोटदुखी पोटाशी निगडीत समस्यांचं एक लक्षणदेखील असू शकतं. याव्यतिरिक्त ताप, यूरीनरी ट्रॅक्टशी निगडीत समस्या, स्टमक इन्फेक्शन यांसारख्या समस्यांमध्येही पोटदुखी हे लक्षणं असू शकतं. 

इनडायजेशनमुळे वाढतात पोटाच्या समस्या... 

गॅस, अपचन किंवा इनडायजेशन यांसारख्या समस्या पोटदुखीचं कारण ठरतात. जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही त्यावेळी पोट जड वाटणं, गॅस, पोट फुगण्याची समस्या आणि अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. यासर्व कारणांमुळे आंबट ढेकर, अस्वस्थता आणि पोटदुखी सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

लिंबू पाणी प्यायल्यानेही पोट दुखू शकतं...
 
काही लोकांच्या पोटात दुखण्यामागील कारण लिंबू पाणी हेदेखील असू शकतं. अनेकदा लिंबाच्या पाण्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात वेदना होऊ शकतात. लिंबामध्ये असलेलं सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाणा पोटामध्ये अधिक प्रमाणात झालं तर पोट दुखू लागतं.

प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे जर शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त एक्सॉर्बिक अॅसिडचं प्रमाण जास्त झालं तर मात्र त्रास सहन करावा लागू शकतो. 

कॉन्स्टिपेशन देखील पोटदुखीचं असू शकतं कारण... 

बद्धकोष्ट किंवा कॉन्स्टिपेशनमुळे पोटदुखीचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा यामुळे पोट भरल्याप्रमाणे वाटते. याव्यतिरिक्त पचनक्रिया सुरळीत नसेल तर किंवा एखादी अ‍ॅलर्जी झाल्यामुळे लोकांना पोटदुखीचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही जर पोटदुखीचा सामना करत असाल तर आधी डॉक्टरांची मदत घ्या.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)


Web Title: stomach allergy constipation and too much of citric fruits can be a reason of stomach ailments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.