साबण की हॅण्डवॉश? वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काय वापरायचं, तज्ज्ञ म्हणाले की....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:37 PM2020-09-03T14:37:24+5:302020-09-03T14:38:28+5:30

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या माहामारीपासून बचावासाठी जगभरातील आरोग्यसंस्था वेगवेगळे उपाय सांगत आहेत.

Soap or handwash What to use to prevent corona infection says experts | साबण की हॅण्डवॉश? वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काय वापरायचं, तज्ज्ञ म्हणाले की....

साबण की हॅण्डवॉश? वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काय वापरायचं, तज्ज्ञ म्हणाले की....

Next

कोरोनाच्या माहामारीत आता मास्क वापरणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं सगळ्यांच्याच आयुष्यातील  मह्त्वाचा भाग बनलं आहे. मास्क लावण्याची सवय सगळ्यांनी करून घेतली आहे. सध्या साबण, सॅनिटायजरचा वापर सर्वाधिक होताना दिसून येत आहे. फ्रेब्रुवारीपासून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या माहामारीपासून बचावासाठी जगभरातील आरोग्यसंस्था वेगवेगळे उपाय सांगत आहेत. हात धुण्याची योग्य पद्धत गरम पाणी पिण्याचे फायदे, सॅनिटाजर लावण्याचे महत्व वारंवार पटवून दिलं जातं आहे. दरम्यान जागतिक आरोग्यं संघटनेनं ग्राफिक्स प्रकाशित केलं आहे. यात हात धुण्याची योग्य पद्धत दाखवलेली आहे. 

बोस्टनच्या नॉर्थ ईस्टर्न यूनिवर्सिटीमधील केमिस्ट्री आणि केमिकल बायोलॉजीचे प्रोफेसर थॉमस गिलबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसला नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे साबण आणि गरम पाण्यानं हात धुणं. व्हायरसचेही अनेक मेंब्रेन्स असतात हे मेंब्रेन्स जेनिटिक पार्टिकल्सनी वेढलेले असतात. या कणांना साबण आणि पाण्याने नष्ट करता येऊ शकतं मानवी शरीरावर प्रभाव टाकत असलेल्या व्हायरसच्या कॉपिवर साबणाच्या पाण्याचा परिणाम होतो. त्यामुळे व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. 

गिल्बर्ट यांनी  सांगितले की हात धुताना जास्त  घाई करू नये. साबणानं २० सेकंद हात चोळल्यानंतर पाण्याखाली धुवावेत. या वेळात लिपिड मेंब्रेन आणि साबणाची  रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते. साबण आणि पाण्याचा वापर शक्य असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नका. काहीही खाण्याआधी, शौचास जाऊन आल्यानंतर हात चांगले स्वच्छ धुवायला हवेत. 

काही लोक एंटी व्हायरल हॅण्डवॉशचा वापर करतात. हा हॅण्डवॉश साबणापेक्षा जास्त प्रभाव असल्याचा समज अनेकांमध्ये आहे. पण असं नसून बाजारात उपलब्ध असलेला कोणताही साबण किंवा साबण किंवा हॅण्डवॉश बॅक्टेरियांशी लढण्याासाठी परिणामकारक ठरतो. येत्या काळात पाण्यात जास्त प्रमाणत एंटी बॅक्टेरियल द्रवांचा समावेश असेल तर पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरू शकतं अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गिल्बर्ट आणि मायकेस  हे दोन्ही तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत आहेत की कोरोना व्हायरशी लढण्यासाठी वापरात असलेलं पाणी योग्य गुणवत्तेचं असावं. ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो. अशा ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणं कठीण असतं. 

जेवण बनवताना, जेवताना आणि जेवण वाढताना हात धुऊन घ्यावेत शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे आवश्यक शिंकल्यानंतरही हात स्वच्छ धुवायला हवेत. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबण जास्त फायदेशीर आहे. साबण व्हायरसमध्ये असलेल्या लिपिडचा सहजपणे खात्मा करू शकतं. साबणात फॅटी अ‍ॅसिड आणि सॉल्टसारखे तत्व असतात. ज्याना एम्पिफाइल्स म्हटलं जातं. साबणातील हेच गुण व्हायरसच्या बाहेरील थराला निष्क्रिय करतात.

हे पण वाचा-

काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा

'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

Web Title: Soap or handwash What to use to prevent corona infection says experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.