कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 10:59 AM2020-01-04T10:59:02+5:302020-01-04T11:04:40+5:30

खासकरून या रिसर्चमध्ये अशा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं जे जास्त वेळ पॅक असलेल्या ऑफिसमध्ये काम करतात. ज्यांना बाहेरील वातावरणात आणि हिरवळीत जास्त एक्सपोजर मिळत नाही.

Small plant placed on work desk reduce stress | कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल!

कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल!

Next

(Image Credit : malaymail.com)

जपानमधील ह्योगो युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, वर्क प्लेस म्हणजेच ऑफिसमध्ये टेबलवर ठेवलं गेलेलं एक छोटं रोपही व्यक्तीचा स्ट्रेस कमी करण्यास फायदेशीर ठरतं. हा रिसर्च इनडोअर प्लांट्स द्वारे कर्मचाऱ्यांच्या मेंटल हेल्थला बूस्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आला. खासकरून या रिसर्चमध्ये अशा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं जे जास्त वेळ पॅक असलेल्या ऑफिसमध्ये काम करतात. ज्यांना बाहेरील वातावरणात आणि हिरवळीत जास्त एक्सपोजर मिळत नाही.

(Image Credit : euroimmunblog.com)

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, आजूबाजूला प्लांट्स म्हणजेच झाडे असल्याने मूड चांगला राहतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण या रिसर्चमधून समोर आलं आहे की, झाडामुळे एखाद्या व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास किती टक्के कमी केला जाऊ शकतो. खासकरून इनडोअर प्लांट्स. 

हा रिसर्च ओवन जर्नल हॉर्ट टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यातील अभ्यासकांचं मत आहे की, आजही अनेक लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत की, वर्कप्लेसवर ठेवण्यात आलेल्या छोट्या छोट्या प्लांट्सने कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यास मदत मिळते. या रिसर्चमध्ये ६३ अशा कर्मचाऱ्यांना समावेश करण्यात आला जे एकाच डेस्कवर तासंतास बसून काम करतात.

(Image Credit : Social Media)

अभ्यासकांनी या रिसर्चदरम्यान स्टेट-ट्रऐट एंग्जायटी इंवेंट्रीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सायकॉलॉजिकल आणि सोशिओलॉजिकल स्ट्रेसची मोजणी केली. यादरम्यान त्यांच्या डेली वर्क रूटीनला फॉलो करताना प्लांट ठेवण्याआधी आणि प्लांट ठेवल्यानंतर पल्स रेटने मोजण्यात आलं. यातून समोर आलं की, प्लांट ठेवण्यासाठी केवळ ३ मिनिटांनंतरच त्यांचा पल्स रेट कमी झाला होता.

(Image Credit : Social Media)

या रिसर्चदरम्यान थकवा आल्यावर एखाद्या कर्मचाऱ्याने प्लांटकडे पाहिल्यावर त्याच्या मूडवर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून असं समोर आलं की, वर्क स्टेशनजवळ प्लांट असल्याने या प्लांटच्या असण्याच्या प्रभाव कर्मचाऱ्यावर सकारात्मक पडतो. इतकेच नाही तर त्याने प्लांटकडे बघितलं किंवा नाही बघितलं तरी सुद्धा कर्मचाऱ्याचा स्ट्रेस कमी होतो.

(Image Credit : metro.co.uk)

प्लांट ठेवण्याआधीच्या डेटाची तुलना प्लांट ठेवल्यानंतरच्या डेटासोबत करण्यात आली. यातून समोर आलं की, वर्कस्टेशनवर ठेवण्यात आलेलं छोटं झाड मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा तणाव कमी करण्यास मदत करतो. कर्मचारी आधीच्या तुलनेत अधिक शांत आणि सकारात्मक राहतात.


Web Title: Small plant placed on work desk reduce stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.