Cancer बद्दल 'हे' माहीत असायलाच हवं; लक्षणं, उपचार, तज्ज्ञांचा सल्ला अन् बरंच काही फक्त एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:02 PM2021-10-07T13:02:59+5:302021-10-07T13:11:15+5:30

Signs of Cancer Symptoms, Causes, Types, Treatment : कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरूकता पाहायला मिळत आहे. अनेकांना वाटतं कॅन्सर एकच किंवा दोनच प्रकारचे असतात. पण असं नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचे काही प्रकार सांगणार आहोत.

Signs of Cancer: Symptoms, Causes, Types, Treatment & Stages and fortis doctors advice | Cancer बद्दल 'हे' माहीत असायलाच हवं; लक्षणं, उपचार, तज्ज्ञांचा सल्ला अन् बरंच काही फक्त एका क्लिकवर 

Cancer बद्दल 'हे' माहीत असायलाच हवं; लक्षणं, उपचार, तज्ज्ञांचा सल्ला अन् बरंच काही फक्त एका क्लिकवर 

googlenewsNext

मुंबई - कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा किती गंभीर आणि जीवघेणा आजार आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे. मात्र जर वेळीच या आजाराची माहिती मिळाली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो. या आजारातून बाहेर आलेली कितीतरी उदाहरणे बघायला मिळतात. अर्थातच यावरील उपचार जरा महागडे आहेत. पण आता कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरूकता पाहायला मिळत आहे. अनेकांना वाटतं कॅन्सर एकच किंवा दोनच प्रकारचे असतात. पण असं नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचे काही प्रकार सांगणार आहोत. जे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये पाहायला मिळतात. स्त्री कर्करोग हे प्रामुख्याने 5 प्रकारचे असतात. अंडाशयाचा कॅन्सर म्हणजे Ovarian Cancer, गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे Uterine Cancer, गर्भाशयाच्या कोषीचा कॅन्सर म्हणजे Cervical Cancer, योनीचा कॅन्सर म्हणजे Vaginal Cancer आणि Vulval Cancer.

कॅन्सर म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात सर्वप्रथम भीती निर्माण होते. पण डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलचे समज आणि गैरसमज याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने लोकांना न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. अनिल हेरूर (Head of Department & Senior Consultant - Surgical Oncology), डॉ. हितेश सिंघवी (Consultant - Surgical Oncology, Head & Neck Cancer), डॉ. निखिल धर्माधिकारी (Consultant - Surgical Oncology ), डॉ. राहुलकुमार चव्हाण (Consultant -Surgical Oncology) यांनी कोरोना आधी कॅन्सवर असलेले उपाय आणि आता झालेले बदल. तसेच प्रमुख लक्षणं कोणती, कॅन्सरबद्दल भीती काढून टाकण्यासाठी खास टिप्स, कशी काळजी घ्यावी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. काही वेळा कॅन्सरची लक्षणं ही लवकर दिसत नाहीत पण लक्षणं दिसल्यास सतर्क होणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच काही कॅन्सरच्या लक्षणांबाबत जाणून घेऊया. 

अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणं (Ovarian Cancer)

- पाठ खूप दुखणे.
- पोटात गोळा येणे.
- पोटात पाणी होणे
- छातीत पाणी होणे. 
- जेवण न जाणं.
- वजन कमी होणं.

गर्भाशयाच्या कोषीचा कॅन्सर (Cervical Cancer)

- मासिक पाळीच्या मध्ये खूप रक्तस्त्राव होणं.
- मासिक पाळी खूप वेळ सुरू असणं.
- पाळी थांबल्यानंतरही रक्तस्त्राव होणं.
- संभोग करताना खूप त्रास होणे अथवा रक्तस्त्राव होणं.
- ओटी पोटात दुखणे.

50 ते 55 या वयोगटातील लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे पण तरुण वयात होण्याचा धोका देखील आहे. जवळपास 95 टक्के केसेसमध्ये हे HPV इन्फेक्शनमुळे होतं. HPV म्हणजे Human Papilloma Virus. मात्र आता हे इन्फेक्शन रोखण्यासाठी काही लसी उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करता येतात. 

ओरल कॅन्सरची लक्षणं 

- तोंडामध्ये पांढरा पॅच तयार होतो.
-  दात दुखणे.
-  ब्रश करताना रक्तस्त्राव होणं.
- बोलताना त्रास होणे.
- आवाजात बदल होणे.

85 टक्के ओरल कॅन्सरचं मुख्य कारण तंबाखू, गुटखा आणि इतर हानिकारक पदार्थ आहेत. तसेच यामध्ये तोंडाची स्वच्छता ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओरल कॅन्सरमध्ये स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जो काही त्रास तुम्हाला असेल त्याबाबत डॉक्टर माहिती देतील. 

जठर आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणं

- पोटामध्ये गॅस होणं
- अन्न गिळण्यास त्रास होणं.
- सतत खोकला येणं.
- छातीत दुखणं, जळजळ होणं.
- भूक न लागणं.
- पोट फुगणं

पॅक अन्नपदार्थ न खाणे, मिठाचे अतिसेवन न करणे हे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच व्यायाम करणे, पोषक आहार घेणे गरजेचं आहे. जीवनशैली नियंत्रित ठेवली तर कॅन्सरचा धोका कमी होतो. 

मोठया आतड्याचा कॅन्सर (Colorectal Cancer)

मोठया आतड्याचा कॅन्सर ओळखण्यासाठी खूप वेळ लागतो कारण शौचाला जाताना यामध्ये  रक्तस्त्राव होतो. त्यामुळे लोकांना हे मूळव्याध आहे असं वाटतं. पण अनेकदा मूळव्याध नसून तो कॅन्सर असतो. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 


 

 

Web Title: Signs of Cancer: Symptoms, Causes, Types, Treatment & Stages and fortis doctors advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.