डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:06 PM2019-10-01T13:06:10+5:302019-10-01T13:10:03+5:30

डायबिटीस रूग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर अनेक लोक सल्ले देतात. एवढचं नाहीतर डायबिटीससाठी डाएट चार्ट तयार केले जातात. या डाएट चार्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचा समावेश करण्यात येतो.

Should diabetic patients eat desi ghee or not | डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही?

डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही?

googlenewsNext

डायबिटीस रूग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर अनेक लोक सल्ले देतात. एवढचं नाहीतर डायबिटीससाठी डाएट चार्ट तयार केले जातात. या डाएट चार्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचा समावेश करण्यात येतो. खरं तर डायबिटीस रूग्णांच्या मनात नेहमीच डायबिटीस कंट्रोल, डायबिटीस  लेव्हल यांसारखे प्रश्न असतात. 

डायबिटीसमध्ये योग्य आहार घेणं अतंत्य आवश्यक असतं. जर आहाराकडे दुर्लक्षं केलं तर आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं. त्यामुळे डायबिटीस रूग्णांनी आपल्या आहाराकडे योग्य लक्षं देणं आवश्यक असतं. 

आहारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तेल किंवा तूप. तेल किंवा तूपाबाबत एक प्रश्न नेहमीच विचारण्यात येतो. तो म्हणजे, डायबिटीस रूग्णांनी तूप खाणं फायदेशीर ठरतं का? खरं तर हेल्दी कुकिंग ऑइलचे ऑप्शन्स आरोग्याला फायदा पोहोचवण्यापेक्षा अनेकदा नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

अनेक विशेष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तूप आरोग्यासाठी उत्तम ठरतं. तूपाचा समावेश अनेक औषधांमध्येही केला जातो. जाणून घेऊया तूपामध्ये असं काय आहे, जे तूपाला डायबिटीस रूग्णांसाठी उत्तम बनवतं? 

  • तूपामध्ये असलेलं फॅटी अ‍ॅसिड मेटाबॉलिजिंगमध्ये फायदेशीर ठरतं आणि हाय ब्लड प्रेशर मॅनेज करण्यासाठी मदत करतं. जर तूप भातासोबत खाल्लं तर भातातील साखर पचवण्यासाठी मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही जेवण तयार करण्यासाठी शुद्ध तूपाचा वापर करा. तसेच हे तूप गाईच्या दूधापासून तयार करण्यात आलेलं असेल तर अधिक उत्तम ठरतं. 
  • शुद्ध तूप किंवा क्लेरिफाइड बटर चांगले फॅट्स म्हणजेच, हेल्दी फॅट्सचा उत्तम स्त्रोत आहे. जे तुम्ही आहारात समावेश करत असलेले पदार्थ अवशोषित करण्यासाठी मदत करतं. तसेच यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे डायबिटीस रूग्णांना फायदा होतो.
  • शुद्ध तूप पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही मदत करतं. त्यामुळे आपल्या आहारात तूपाचा योग्य प्रमाणात समावेश करणं बद्धकोष्टापासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 
  • तूपामध्ये लिनोलेइक अ‍ॅसिड असतं. जे हृदयाचं आरोग्य चांगल राखण्यासाठी मदत करतं. डायबिटीस रूग्णांना हृदयरोग बळावण्याची शक्यता अधिक असते. अशातच तूपाचा समावेश केल्याने हृदयरोगांपासून बचाव होण्यास मदत होते.
  • खरं तर शरीरामध्ये जमा झालेले फॅटस तूपाचं योग्य प्रमाणात सेवन केल्याने बर्न होण्यास मदत होते. यामुळे डायबिटीस रूग्ण वजन कमी करण्यासाठीही तूपाचा वापर करू शकतात.
  • तूपामध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटही असतात, जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. साधरणतः रोगप्रतिका शक्ती कमी झाल्याने डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. 
  • ऑरगॅनिक तूप किंवा शुद्ध तूपाचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोमताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Should diabetic patients eat desi ghee or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.