धक्कादायक! ८ वर्षांआधी खाल्ला होता 'याने' खराब बर्गर, आधी झाला पॅरालिलिस, नंतर मृत्यू....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:22 PM2019-09-16T12:22:26+5:302019-09-16T12:26:18+5:30

वेगवेगळे फास्ट फूड कसे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हे आपण नेहमीच वाचत आणि ऐकत असतो. पण लोकांची सवय मोडणं काही सोपं काम नाही.

Shocking! Boy dies paralysed contaminated lidl burger in France | धक्कादायक! ८ वर्षांआधी खाल्ला होता 'याने' खराब बर्गर, आधी झाला पॅरालिलिस, नंतर मृत्यू....

धक्कादायक! ८ वर्षांआधी खाल्ला होता 'याने' खराब बर्गर, आधी झाला पॅरालिलिस, नंतर मृत्यू....

Next

वेगवेगळे फास्ट फूड कसे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हे आपण नेहमीच वाचत आणि ऐकत असतो. पण लोकांची सवय मोडणं काही सोपं काम नाही. फास्ट फूडमुळे वेगवेगळे आजार आणि वजन वाढत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण कधी एका बर्गरमुळे कुणाचा मृत्यू झाल्याचं ऐकलंय का? नाही ना? पण आता अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Nolan Moittie असं या मुलाचं नाव असून एक खराब झालेला बर्गर खाल्ल्यामुळे तो गेल्या ८ वर्षांपासून पॅरोलिलिससोबत लढत होता. फ्रान्सच्या या मुलाला शनिवारी १४ सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टरांनी सांगितले की, हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय.

जून २०११ ची ही घटना आहे. नोलनने एक Contaminated Burger खाल्ला होता. हा बर्गर खाल्ल्यावर तो मानसिक आजारी झाला. त्यानंतर त्याचं बोलणं बंद झाल. इतकंच नाही तर त्याची हालचालही बंद झाली. त्याला पॅरालिलिस झाला. शरीराच्या अर्ध्या भागाने काम करणं बंद केलं होतं.

नोलनच्या वकिलांनी सांगितले की, एक खराब, दूषित बर्गर खाऊन त्याचं एकदा नाही तर अनेकदा मरण झालं. त्याच्या परिवारालाही खूपकाही सहन करावं लागलं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जर तो जगला असता तर त्याला आयुष्यभर किडनी संबंधी आजारांचा सामना करावा लागला असता.

Guy Lamorlette हा त्या रेस्टॉरन्टचा मालक आहे, जेथून नोलनने बर्गर खरेदी केला होता. त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण ही दोन वर्षांआधीची गोष्ट आहे. आता नोलनच्या मृत्यूनंतर केस पुन्हा सुरू होईल.

Web Title: Shocking! Boy dies paralysed contaminated lidl burger in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.