सावधान... प्रजनन क्षमता, स्पर्म काउंटवर प्रदूषणामुळे गंभीर परिणाम; अभ्यासातून चिंताजनक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:15 PM2021-03-27T17:15:32+5:302021-03-27T17:22:06+5:30

महासाथीपेक्षाही प्रदूषण ठरतंय अधिक घातक

serious consequences due to pollution on fertility sperm count Human penises are shrinking because of pollution warns scientist | सावधान... प्रजनन क्षमता, स्पर्म काउंटवर प्रदूषणामुळे गंभीर परिणाम; अभ्यासातून चिंताजनक माहिती

सावधान... प्रजनन क्षमता, स्पर्म काउंटवर प्रदूषणामुळे गंभीर परिणाम; अभ्यासातून चिंताजनक माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देमहासाथीपेक्षाही प्रदूषण ठरतंय अधिक घातकअमेरिकेत संशोधनातून करण्यात आला दावा

मानवासाठी कोणतीही महासाथ ही खऱ्या अर्थानं घोक्याची ठरत असते. परंतु प्रदूषणही त्यापेक्षा जास्त घातक आहे. दरम्यान, वाढत्या प्रदुषणामुळे मानवी गुप्तांगाचा आकार लहान होत असल्याचा दावा एका अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील माऊंट सिनाई रुग्णालयात करण्यात आलेल्या एका अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे. 

माऊंट सिनाई रुग्णालयातील एन्वायरमेंटल मेडिसिन अँड पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ. शन्ना स्वान यांनी आपल्या पुस्तकातून अध्ययनाच्या आधारे हा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या अध्ययनात प्रदूषणामुळे केवळ मानवी गुप्तांगाचाच आकार कमी होत नाही, तर मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. डॉ. स्वान यांनी आपल्या संशोधनाच्या आधारावर 'काऊंट डाऊन' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे. डॉ. स्वान यांनी ही मानवाच्या अस्थित्वासंबंधीचं संकट असल्याचं म्हटलं आहे. अभ्यासादरम्यान अशा धोकादायक रसायनाची ओळख पटली आहे जे मानवामधील प्रजनन क्षमता कमी करत आहे. तसंच यासह मानवी गुप्तांगाचा आकारही लहान होत आहे. याशिवाय मुलं Malformed Genitals सह जन्माला येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यांनी प्रदुषणाबाबत पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिलाही ट्वीट केलं आहे. तसंच प्रदुषणाच्या प्रकरणी आपण त्यांच्यासोबत असल्याचंही म्हटलं आहे. स्काय न्यूजनं या संशोधनाशी निगडीत वृत्त प्रकाशित केलं होतं.

मानवासाठी धोकादायक ठरत असलेल्या या रसायनाचं नाव फॅथेलेट्स असं आहे. या रसायनाचा वापर प्लॅस्टिक तयार करण्यासाठी केला जातो. याचा परिणाम मानवाच्या एंडोक्राईन सिस्टमवर होतो. मानवात एंडोक्राईन ही हार्मोन्स निर्मिती करते. प्रजननासंबंधी हार्मोन्सची निर्मितीही याद्वारेच होते. फॅथेलेट्स या रसायनाचा वापर प्लॅस्टिक लवचिक करण्यासाठी होतो. स्वान यांच्या म्हणण्यानुसार खेळणी आणि जेवणामध्ये हे रसायन मिसळलं जात असून मानवाच्या प्रजनन संस्थेलाही धोका पोहोचवतो, असं त्यांनी नमूद केलं आहे. 

कसा होतो शरीरावर परिणाम?

फॅथलेट्स एस्ट्रोजन हार्मोन्सची नकल करतो. त्यामुळे शरीरातील हार्मान्स निर्मितीची प्रक्रिया बिघडते आणि याचा नवजात बालकांवर तसंच ज्येष्ठांवर होत असल्याचा दावाही या अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. २०१७ मध्ये करण्यात आलेल्या अहवालातून पाश्चिमात्य देशांमधील पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट चार दशकांत ५० टक्क्यांपेक्षाही अधिक कमी झाल्याचं समोर आलं होतं. ज्या पद्धतीने प्रजनन दर कमी होत आहे, बहुतेक पुरुष २०४५ पर्यंत भ्रूण तयार करणाऱ्या स्पर्मची निर्मिती करण्यास असमर्थ ठरतील, असंही डॉ. स्वान यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: serious consequences due to pollution on fertility sperm count Human penises are shrinking because of pollution warns scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.