Scientist discoveres new screaming covid test instead of unpleasant nasal swab tests | New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती..

New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती..

कोरोना टेस्टच्या (New Covid Test) वेदनादायी पद्धतीपासून लवकरच सुटका मिळणार आहे. नेदरलॅंडच्या एका वैज्ञानिकाने कोरोना टेस्ट करण्याची एक वेगळी पद्धत शोधली आहे. ही फारच वेगळी, सोपी वेगवान आहे. नव्या पद्धतीने कोरोना टेस्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ एक कॅबिनमध्ये जाऊन जोरात ओरडावं लागेल किंवा गाणं म्हणावं  (Screaming Covid Test) लागेल. यानेच तुमची टेस्ट होईल. आता तुमच्या नाकातून किंवा तोंडातून सॅम्पल घेण्याची गरज नाही. 

कोरोना टेस्ट (Screaming Covid Test) च्या नव्या आणि सोप्या पद्धतीचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाचं नाव आहे पीटर वॅन वीस. पीटर यांच्यानुसार, कोरोना टेस्टसाठी व्यक्तीला एअरलॉक्ड कॅबिनमध्ये जोरात ओरडावं लागेल किंवा गाणं गावं लागेल. एक इंडस्ट्रिअल प्युरिफायर तोंडातून निघणारे पार्टिक्लस म्हणजे थुंकीचे थेंब जमा करेल. त्यांचा कोरोनाची टेस्ट करण्यासाठी वापर केला जाईल. (हे पण वाचा : सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा)

वैज्ञानिक पीटर म्हणाले की, 'जर एखादी व्यक्ती संक्रमित असेल तर ती ओरडल्यावर त्यांच्या तोंडातून १० हजार पार्टिकल्स निघतात. याच पार्टिकल्सने कोरोना व्हायरसची टेस्ट केली जाईल'. दरम्यान पीटर यांनी नेदरलॅंडमच्या एम्सटर्डममध्ये कोरोना टेस्टिंग सेंटरजवळ आपला बूथ लावला आहे. यात ओरडून आणि गाणं गाऊन कोरोची टेस्ट केली जात आहे. (हे पण वाचा : आता दिवसाचे २४ तास चालणार कोरोना लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)

नव्या पद्धतीने कोरोना टेस्ट करणाऱ्या सोरोयाने सांगितले की, ही पद्धत फारच सोपी आहे. याने वेदनाही होत नाही. जेव्हा तुम्हाला कुणी बघत नसतं तेव्हा ओरडणं फारच चांगलं वाटत असतं. कोरोना टेस्टचा माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

वैज्ञानिक पीटर यांनी सांगितले की, कोरोना टेस्टच्या या प्रक्रिये ३ मिनिटांचा वेळ लागतो. सॅम्पलमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रमाणाची टेस्ट नॅनोमीटर-स्केल सायजिंग डिवाइसच्या मदतीने केली जाते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Scientist discoveres new screaming covid test instead of unpleasant nasal swab tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.