हिवाळ्यात लोक जास्त आळशी का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण आणि उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:03 AM2020-01-06T11:03:46+5:302020-01-06T11:10:06+5:30

अनेकांना असा प्रश्न पडत असेल की, हिवाळ्यात इतका आळस का येतो? जाणून घ्या याचं उत्तर....

scientific reason why people feel more lazy during winters and how to fix it in | हिवाळ्यात लोक जास्त आळशी का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण आणि उपाय....

हिवाळ्यात लोक जास्त आळशी का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण आणि उपाय....

googlenewsNext

यंदा देशातील काही भागांमध्ये थंडीने सगळेच रेकॉर्ड तोडले आहेत आणि थंडी इतकी वाढली आहे की, घरातून बाहेर निघणंही कठिण झालं आहे. सगळीकडेच गोठवणारी थंडी पडत आहे. याचा थेट प्रभाव लोकांच्या लाइफस्टाईलवरही पडतो आहे. वाढत्या थंडीचा प्रभाव सकाळी उठण्यापासून ते फिटनेसपर्यंत आणि ऑफिस पोहोचण्यापर्यंत बघायला मिळतोय.

सकाळी ६ वाजता झोपेतून उठणारे आता उशीराने उठत आहेत. या दिवसात फिजिकल अ‍ॅक्टिविटीमध्ये कमतरता येणे नॉर्मल बाब आहे. अनेकांना थकवा, आळश आणि एनर्जी डाऊन असल्यासारखं वाटत असतं. याचं वैज्ञानिक कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे स्पष्ट झालं आहे की, जानेवारी वर्षातला सर्वात कमी प्रॉडक्टिविटीचा किंवा आळस येणारा महिना असतो.

हिवाळ्यात आळस, सुस्तीचं कारण

(Image Credit : lifehack.org)

फिजिशिअन डॉ. जेनिफर एश्टन यांच्यानुसार, हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि उन्ह कमी असते. याचा थेट प्रभाव व्यक्तीच्या मूडवर पडतो. सूर्याची किरणे आपल्या सर्केडिअन रिदमला प्रभावित करतात. याने मेंदूमध्ये सेरोटोनिन लेव्हलमध्ये बदल होतो.

(Image Credit : Social Media)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ यूएस यांच्यानुसार मेंदूमध्ये सेरोटोनिन लेव्हलमध्ये बदल झाल्याने सुस्ती आणि आळश वाढतो. इतकेच नाही तर सेरोटोनिन लेव्हलमध्ये बदल झाल्यावर तुम्हाला सामान्यपणे ज्या गोष्टी आवडतात, त्यांबाबतही तुमचा इंटरेस्ट कमी होतो. हेच कारण आहे की, हिवाळ्यात शरीर एनर्जेटिक फिल होत नाही आणि यानेच अंथरूनातून बाहेर येण्याचं मन होत नाही.

सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर दूर करण्याचे उपाय

(Image Credit : entrepreneur.com)

सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर दूर करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांनी तुम्ही आराम मिळवू शकता. यामागे सर्वात मोठं कारण उन्ह न मिळणं हे आहे. तुम्हाला होणारी समस्या दूर करण्यासाठी उन्हात बसा. रोज कमीत कमी १५ ते २० मिनिटे उन्हाच्या संपर्कात रहावे. 

व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होईल

योग्य प्रमाणात उन्हाच्या संपर्कात राहिल्याने केवळ शरीराला ऊर्जा मिळेल असं नाही तर व्हिटॅमिन डी चं प्रमाणही योग्य राहील. भारतात जवळपास ८० टक्के लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक कमजोरी वाटू लागते. 

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारी समस्या

इम्यूनिटी कमजोर होणे

हाडे कमजोर होणे

लठ्ठपणा वाढणे

वय अधिक दिसू लागणे

सूज आणि इन्फेक्शनची समस्या

त्वचा डार्क होणे


Web Title: scientific reason why people feel more lazy during winters and how to fix it in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.