Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:43 AM2021-02-19T10:43:18+5:302021-02-19T10:43:41+5:30

Rice and Obesity : यात जराही शंका नाही की, तांदूळ खासकरून पांढरे तांदूळ (White Rice) रिफाइंड असतात. यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं.

Rice and Obesity : Does eating white rice increases weight and obesity what is the truth | Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य...

Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य...

googlenewsNext

Rice and Obesity : केवळ भारतातच  नाही तर जगभरात भात हा सर्वात पॉप्युलर पदार्थ आहे आणि हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे सर्वात जास्त खाल्ला जातो. मात्र, भाताबाबत अनेकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. जसे की, भात(Rice) खाल्ल्याने वजन वाढतं (Rice and Obesity) आणि भात खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हलही(Blood Sugar Level) वाढते. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी भात खाऊ नये असेही सांगितले जाते. याच कारणामुळे ज्यांना वजन कमी करायचं असतं ते आधी भात खाणं बंद करतात. पण खरंच भाताने वजन वाढतं(Obesity) का? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

भातात कार्ब्स अधिक, फायबर कमी...

medicalnewstoday.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यात जराही शंका नाही की, तांदूळ खासकरून पांढरे तांदूळ (White Rice) रिफाइंड असतात. यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. यातील फायबरही भात शिजवताना नष्ट होतात. रिफायनिंगची प्रक्रियादरम्यान फायबर नष्ट झाल्याने भाताचा ग्लायसिमिक इंडेक्स वाढतं. हेच कारण आहे की, जर फार जास्त प्रमाणात भाताचं सेवन केलं तर निश्चितपणे लठ्ठपणा आणि अनेक प्रकारच्या क्रॉनिक आजारांचा धोका असतो. (हे पण वाचा : Weight Loss : खूप खाऊनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार का होत नाहीत? जाणून घ्या कारण...)

डाळ, भाजी आणि तूप घालून खावा भात

अनेक हेल्थ एक्सपर्ट आणि न्यूट्रिशिअन वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये डाळ-भात (Dal and Rice) खाण्याचा सल्ला देतात. मात्र, डायटिशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्यानुसार, तांदळाच्या सिंगल पॉलिश्ड व्हरायटीचं सेवन करायला हवं. सोबतच केवळ भात खाण्याऐवजी, भातात प्रोटीन असलेली डाळ, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेल्या भाज्या आणि तूप घालून खावा. असं केल्याने तुमच्या शरीरालाही भातातील कार्ब्ससोबतच आवश्यक प्रोटीन आणि इतर न्यूट्रिएंट्सही मिळतील. याने वजन वाढण्याचा धोका राहणार नाही. (हे पण वाचा : Health Tips : तुम्हीही घाईघाईने आणि उभं राहून जेवण करता का? वेळीच व्हा सावध नाही तर....)

पोर्शन साइजवर लक्ष ठेवणं गरजेचं

भात खाल्ल्याने काही लोकांचं वजन का वाढतं याचं कारण हे आहे की, ते त्यांच्या पोर्शन साइजवर लक्ष देत नाहीत. चपाती खाताना त्या मोजणं सोपं असतं. म्हणजे तुम्ही २ चपात्या किंवा ३ चपात्या खाल्ल्या हे मोजता येतं. पण भात खाताना हे मोजता येत नाही. हे समजत नाही की, किती भात खाणं आरोग्यासाठी चांगलं राहील किंवा अडचणीचं ठरू शकतं. अशात अनेक लोक भातासोबत ओव्हरइंटिग करतात आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. त्यांना लठ्ठपणाची समस्या होते. त्यामुळे छोट्या प्लेटमध्ये खा. जेणेकरून तुम्ही भाताचं सेवन लिमिटेड कराल.

Web Title: Rice and Obesity : Does eating white rice increases weight and obesity what is the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.