वयस्क लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 10:03 AM2019-08-30T10:03:19+5:302019-08-30T10:13:04+5:30

वजन वाढण्याची समस्या तशी अलिकडे सर्वच वयोगटातील लोकांना होत आहे. मात्र, योग्य आहार घेतला आणि नियमित योग्य एक्सरसाइज केली तर वजन कमी करता येऊ शकतं.

Reasons why belly fat is so hard to lose in adults | वयस्क लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं?

वयस्क लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं?

googlenewsNext

(Image Credit : boldsky.com)

वजन वाढण्याची समस्या तशी अलिकडे सर्वच वयोगटातील लोकांना होत आहे. मात्र, योग्य आहार घेतला आणि नियमित योग्य एक्सरसाइज केली तर वजन कमी करता येऊ शकतं. असं असलं तरी सुद्धा वयस्क लोकांना त्यांच्या पोटाचा घेर कमी करणं कठीण जातं. पोटावर चरबी आल्याने अनेक आजार होतात. कुणालाही चरबीने वाढलेलं पोट नको असतं. पण आपल्याच चुकांमुळे पोटावर चरबी जमा होऊन पोट बाहेर येतं. 

(Image Credit : cbsnews.com)

पोटावर चरबी जमा होण्याच्या मुख्य कारणांमध्ये खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अजिबातच शारीरिक हालचाल न करणे किंवा नियमित एक्सरसाइज न करणे. मात्र, वयस्क लोकांना पोटावरील चरबी कमी करण्यास बराच वेळ लागतो. जर त्यांनी योग्य एक्सरसाइज केली आणि काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांना फायदा होऊ शकतो.

वयस्कांना चरबी कमी करणं कठीण का?

चुकीचा वर्कआउट करणे

अल्कोहोलचं अधिक सेवन

प्रोसेस्ड फूडचं सेवन करणे

पुरेशी झोप न घेणे

चुकीचा वर्कआउट करणे 

(Image Credit : popsugar.com)

वयस्कांसाठी बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योग्य वर्कआउट करण्याची गरज असते. म्हणजे तुम्ही केवळ कार्डिओ वर्कआउट करत असाल तर तुमच्या कंबरेचा आकार कमी होणार नाही. त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य वर्कआउट करणं गरजेचं आहे. जे लोक अधिक तीव्रता असलेला वर्कआउट करतात ते इतरांच्या तुलनेत अधिक बेली फॅट बर्न करतात.

अधिक अल्कोहोलचं सेवन

(Image Credit : drugfoundation.org.nz)

सतत अल्कोहोलचं सेवन केल्याने पोटाच्या चारही बाजूने चरबी जमा होते. रेग्युलर बीअरच्या ३५४ मिलीलीटरमध्ये १५३ कॅलरी असतात. जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल तर अल्कोहोलचं सेवन कमी करावं. 

प्रोसेस्ड फूडचं सेवन

(Image Credit : thetakeout.com)

प्रोसेस्ड फूड्सचं सेवन शरीरात सूज येण्याचं कारण ठरतं आणि यात भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असतं. बेली फॅटचा संबंध सूज येण्याशी आहे. त्यामुळे प्रोसेस्ड फूडचं सेवन कमी करावं. याने तुमचा पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत जाईल. सोबतच वेगवेगळ्या आजारांचाही तुम्हाला सामना करावा लागेल.

पुरेशी झोप न घेणे

(Image Credit : rd.com)

पुरेशी झोप न घेणे बेली फॅट कमी न होऊ देण्याचं मुख्य कारण असतं. तसेच पुरेशी झोप न घेतल्याने वजन वाढतं. पोटावर चरबी जमा होणे टाळण्यासाठी दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. पण केवळ झोप घेऊन पोटावरील चरबी कमी होणार नाही. त्यासाठी योग्य आहार आणि एक्सरसाइज सुद्धा करावी लागेल.

Web Title: Reasons why belly fat is so hard to lose in adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.