Problem of diabetic patients can increase in winter, take care of skin these simple remedies | हिवाळ्यात वाढू शकते डायबिटीसच्या रुग्णांची समस्या, 'या' सोप्या उपायांनी त्वचेची घ्या काळजी

हिवाळ्यात वाढू शकते डायबिटीसच्या रुग्णांची समस्या, 'या' सोप्या उपायांनी त्वचेची घ्या काळजी

रक्तातील  साखरेच्या पातळीचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो. डायबिटीस असलेल्या रुग्णांनी त्वचेसंबंधी  समस्या असल्यास काळजी घ्यायला हवी. कारण डायबिटीस असलेल्यांना त्वचेच्या समस्या अनेकदा उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात डायबिटीच्या रुग्णांनी कशी काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत. जगभरात  जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे डायबिटीसच्या समस्येने पिडीत आहेत. जेव्हा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो आणि त्वचा कोरडी होऊ लागते. परिणामी रक्तातील उच्च ग्लुकोज पातळी शरीरात रक्ताभिसरणास अडचणी निर्माण करते. 

अतिरिक्‍त साखर घालवण्यासाठी शरीराकडून लघवीत रूपांतर  होते. त्याचप्रमाणे जर डायबिटिक रुग्णाच्या पायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर त्वचा कोरडी होऊ शकते. कोरड्या त्वचेमुळे खाज येते त्वचेवर भेगा पडतात आणि त्यामुळे त्वचेचा संसर्ग, जळजळ, लालसरपणा अशा समस्या दिसू लागतात. हा संसर्ग  कोणालाही होऊ शकतो. हिवाळ्यात डायबिटीसच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी. याबाबत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ रिंकी कपूर यांनी अधिक माहिती दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचा कोरडी असेल तर मॉईश्चरायझरचा वापर करा.

उपाय  

त्वचेवर जखम असेल तर त्वरित उपचार करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम किंवा औषध लावा. निर्जंतुक कापसानं छोट्या जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजली असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्‍टरांची भेट घ्या.

दिवाळीत तेलकट अन् गोड खाल्यानं वजन वाढलंय?; बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

आपली त्वचा विशेषत: अंडरआर्म्स, स्तनाच्या खाली, पायाची बोटं स्वच्छ आणि कोरडी ठेवा. सनस्क्रीन किंवा लोशनचा वापर करा. थंडी पासून बचाव करण्यासाठी  तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.

व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा

हिवाळ्यात पायांना असलेल्या भेगा, कोरडी त्वचा, पापुद्रे यांकडे दुर्लक्ष करू नका. जखमेत रुपांतर होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करा. पोषक घटक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. घरगुती पदार्थांपासून तयार करण्यात आलेले लोशन, क्रिमचा वापरही तुम्ही करू शकता. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Problem of diabetic patients can increase in winter, take care of skin these simple remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.