प्रिया बापटचे फेसबुक अकाउंट फेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2016 06:46 AM2016-04-22T06:46:16+5:302016-04-22T12:21:00+5:30

बॉलीवुड असो या मराठी सेलेब्रिटी भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला तरी त्यांचे सोशल मिडीयाचे अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रिया बापटला सामोरे जावे लागत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सनी सवांद साधला असता प्रिया म्हणाली,

Priya Bapat's Facebook Account Fake | प्रिया बापटचे फेसबुक अकाउंट फेक

प्रिया बापटचे फेसबुक अकाउंट फेक

googlenewsNext
लीवुड असो या मराठी सेलेब्रिटी भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला तरी त्यांचे सोशल मिडीयाचे अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रिया बापटला सामोरे जावे लागत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सनी सवांद साधला असता प्रिया म्हणाली, देशातील किवा बाहेर देशातील माझे जे फॅन्स आहेत त्यांनी मला ही गोष्ट लक्षात आणून दिली. ज्या व्यक्तीने माझे फेक अकाउंट बनविले आहे तो व्यक्ती माझ्या फॅन्सला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण याबाबत मी फेसबुकला देखील मॅसेज केला आहे. त्यांनी व्हेरीफेकेशनसाठी माझे काही आयडी प्रुफ मागविले आहे. आणि ते मी त्यांना दिले देखील आहेत. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्यांचा काही रिप्लाय नाही आला. पण ही प्रोसेस लवकर व्हावी अशी माझी इच्छा आह.े तसेच आता माझे जे रियल अकाउंड आहे ते अचानक डिसेबलदेखील  झाले आहे. त्यामुळे मी माझ्या फॅन्सला आव्हान करते की, ज्यांनी कोणी त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली असेल तर त्यांनी ती अनफ्रेंड करावी.




 

Web Title: Priya Bapat's Facebook Account Fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.