भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या  'पीरियड एन्ड ऑफ सेंटेंस' (Period. End Of Sentence) या डॉक्यूमेंटरीला ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाफुड येथे राहणाऱ्या मुलींवर आणि महिलांवर ही डॉक्यूमेंटरी बनविण्यात आली आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भारतीय समाजाची मानसिकता आणि महिलांमध्ये असलेली लज्जा अतिशय सखोलपणे मांडण्यात आली आहे. 

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात  'पीरियड एन्ड ऑफ सेंटेंस' (Period. End Of Sentence) ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट कॅटिगरी फिल्म (Best Short Documentary Film) या पुरस्काराने ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या इंडियन फिल्म प्रोड्यूसर गुनीत मोंगा (Gunit Monga) असून दिग्दर्शक रयाक्ता जहताबची (Rayka Zehtabchi) आहेत. 

महिलांच्या मासिक पाळीवर तयार करण्यात आलेली 26 मिनिटांची ही डॉक्युमेंट्री तुम्ही नेटफ्लिक्स (Netflix) वरही पाहू शकता. या माहितीपटातून मासिक पाळीसंदर्भात महिलांच्या मनात असलेली इर्शा आणि लाज स्पष्टपणे दाखविण्यात आली आहे. देशबरात अनेक सामाजिक संस्था, अनेक सेलिब्रिटी मासिक पाळीबाबत जनजागृती करत असल्याचे आपण पाहतो. परंतु, या गावातील महिलांना अद्याप मासिक पाळीबाबत अनेक गोष्टी माहितच नाहीत. एवढचं नाही तर मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे नक्की काय असतं हे देखील त्यांना ठाऊक नाही. 

अनेक महिलांनी तर याबाबत बोलताना सांगितले की, आम्ही तर सॅनिटरी नॅपकिन्स आणि पॅड अशी नावचं पहिल्यांदा ऐकली आहेत. मग तुम्ही त्या दिवसांमध्ये काय वापरता असं विचारल्यावर महिलांनी दिलेलं उत्तर आश्चर्यकारक होतं. त्या महिला म्हणाल्या की, आम्ही त्या दिवसांमध्ये एखादा कपडा वापरतो. एवकिकडे आपल्या देशांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवर आकारण्यात येणारा जीएसटी बंद करण्यासाठी आपल्याकडे अनेक चळवळी करून त्यावर आकारण्यात येणारा जीएसटी रद्द करण्यात आला. पण उत्तरप्रदेशमधील त्या गावात राहणाऱ्या महिलांना मात्र आपल्यासाठी त्या दिवसांमध्ये वापरण्यासाठी अशी काहीतरी गोष्ट असते आणि ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, याची पुसटशी कल्पनाही नाही. 

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अद्यापही याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे ही ऑस्कर विनिंग डॉक्युमेंन्ट्री फक्त महिलांनीच नाही तर पुरूषांनीही पाहणं गरजेचं आहे. आज आम्हीही तुम्हाला मासिक पाळीबाबत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या महिलांना पाळीदरम्यान त्यांच आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतील.... 

1. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणं

मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव (Menstrual bleeding) होणं ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. परंतु जर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत असेल तर हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. खरं तर मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही. परंतु या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेल तर त्याचा महिलांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे एनीमिया सारख्या घातक आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे थकवा, धाप लागण यांचबरोबर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यावर उपचार करणं फायदेशीर ठरतं. 

2. मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नका

अनक लोकांचा असा गैरसमज असतो की, मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवल्याने गरोदर राहण्याची शक्यता कमी असते. परंतु तज्ज्ञांच्या सल्यानुसार, मासिक पाळीमध्ये शारीरक संबंध ठेवणं शक्यतो टाळावं. कारण या दिवसांमध्ये महिलांच्या योनीतून रक्तस्त्राव होत असतो. ज्यामुळे अनेकदा इन्फेक्शन होण्याचाही धोका संभवतो. 

3. मासिक पाळीच्या 2 ते 3 दिवस आधी रक्तस्त्राव होणं

मासिक पाळीच्या काही दिवसांआधी रक्तस्त्राव होत असेल तर त्याला 'स्पॉटिंग' असं म्हटलं जातं. हा एक प्रकाचा संकेत असतो की, आता गर्भाशयामधून रक्तस्त्राव सुरू होणार आहे. ही सामान्य गोष्ट असून घाबरण्याची अजिबात गरज नसते. 

4. मासिक पाळीसंदर्भातील या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं

- मासिक पाळी 5 ते 7 दिवसांची असते. 

- मासिक पाळीमध्ये कपडा वापरणं कटाक्षाने टाळावं. तसेच या दिवसांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पॉन वापरत असाल तर दर दोन ते तीन तासांनी बदलणं आवश्यक असतं. 

- मासिक पाळी दरम्यान ओटी पोटामध्ये वेदना होणं सामान्य गोष्ट आहे. पण जर प्रमाणापेक्षा जास्त दुखू लागलं तर मात्र ही गोष्ट गंभीर ठरू शकते. 

- या दिवसांमध्ये अस्वस्थ वाटणं, थकवा येणं ही सामान्य गोष्ट आहे. 

5. मासिक पाळीबाबत असलेले समज-गैरसमज

- काही लोकांचा असा समज असतो की, मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचंच असतं. पण काही महिलांच्या बाबतीत हे चक्र 28 दिवसांचं असतं, तर काही महिलांच्या बाबतीमध्ये हे चक्र 24 ते 35 दिवसांचं असतं. 

- काही लोकांचा असा समज असतो की, या दरम्यान महिलेने एका कोपऱ्यात बसून राहणं आवश्यक असतं. तिने नाही कोणाला हात लावणं किंवा देवाच्या कोणत्याही कार्यात सहभाही होणं हे अशुद्ध मानलं जातं. हा समज अत्यंत चुकीचा आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जी प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यात तिच्या एखाद्या मैत्रिणीप्रमाणे तिच्यासोबत असते. त्यामुळे या क्रियेला अंधश्रद्धेचे पाल्हाळे जोडणं अत्यंत चुकीचं आहे.


Web Title: Period. End of Sentence : india based documentary wins oscar this things you should know about your period
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.