तासनतास खुर्चीवर बसून राहत असाल तर वेळीच व्हा सावध,'या' गंभीर समस्येचे व्हाल शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:00 AM2020-02-13T11:00:22+5:302020-02-13T11:06:55+5:30

मोठ्या प्रमाणावर लोक हे ७ ते ८ तास खुर्चीवर बसून काम करत असतात.  

People who sit for hours on chair a day are more likely to get depression | तासनतास खुर्चीवर बसून राहत असाल तर वेळीच व्हा सावध,'या' गंभीर समस्येचे व्हाल शिकार!

तासनतास खुर्चीवर बसून राहत असाल तर वेळीच व्हा सावध,'या' गंभीर समस्येचे व्हाल शिकार!

Next

(image credit-office desings)

मोठ्या प्रमाणावर लोक  हे ७ ते ८ तास खुर्चीवर बसून काम करण्याची नोकरी करत असतात.  जगभरातील अनेक ऑफिसमध्ये तुम्हाला हजारोंच्या संख्येत माणसं बसून तासनतास काम करत असताना दिसून येतील. तुम्ही सुद्धा बराचवेळ बसून जर काम करत असाल तर तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. एका नवीन अभ्यासानुसार  खुर्चीवर जास्त वेळ बसून काम केल्यामुळे ताण-तणाव वाढतो. हे स्पष्ट झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया खुर्चीवर बसण्याचा ताण-तणावाशी काय संबंध आहे.

(image credit- cross.fit2717)

या अभ्यासात  ४,२०० तरूण वयातील मुलामुलींच्या दररोजच्या एक्टिव्हिटीचे विश्लेषण करण्यात आले.  या अभ्यासात   १६ वर्षांपासून पुढील वयोगटातील तरूण मुलांचा समावेश होता.  यात त्यांची मानसीक स्थिती तपासून पाहण्यात आली.  

(image credit-trasform chiropractic)

या रिसर्चनुसार लहान मुलं सोफ्यावर एक  तासापेक्षा जास्त बसून राहत असतील तर त्यांना ताण तणावाचा सामना करावा लागतो.  तरूण मुलांमध्ये ताण-तणावाची जोखिम वाढण्याची शक्यता जास्त असते.  जास्त वेळ  सोफा किंवा खुर्चीवर बसून राहील्यामुळे २८.२ टक्क्यांनी टेंशन येण्याची शक्यता वाढते. मानसीक स्थितीच नाही तर सतत बसून राहील्यामुळे अनेकांना लठ्ठपणाचे शिकार सुद्धा व्हावं लागलं आहे. तसचं कमरेचे आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास कमी वयातच अनेकांना उद्भवतो. ( हे पण वाचा-'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!)

या रिसर्चशी जोडलेले असलेले  लंडन कॉलेजचे लेखक आरोन कंडोला  यांनी असे सांगितलं की जे लोक काहीही  न करता निष्क्रीय बसलेले असतात. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात. मग जास्त टेंशन घेण्याची शक्यता असते.  ही अशी स्थिती असते ज्यात व्यक्ती मानसीक पातळीवर वेगवेगळ्या विचारांनी घेरलेला असतो.  यात अनियमीत जीवनशैली आणि अपुरी झोप हे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. ( हे पण वाचा-पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम)

Web Title: People who sit for hours on chair a day are more likely to get depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.