लिव्हरकडे वेळीच लक्ष द्या, नाहीतर होऊ शकतो फॅटी लिव्हर, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:28 PM2021-07-21T16:28:56+5:302021-07-21T16:29:34+5:30

यकृताला कोणत्या कारणामुळे आजार होतात याची माहिती घेणे आवश्यक आहे. असाच एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर. जाणून घेऊया त्याची लक्षणे अन् उपाय.

Pay attention to the liver in time, otherwise fatty liver can occur, know the symptoms and remedies | लिव्हरकडे वेळीच लक्ष द्या, नाहीतर होऊ शकतो फॅटी लिव्हर, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

लिव्हरकडे वेळीच लक्ष द्या, नाहीतर होऊ शकतो फॅटी लिव्हर, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

googlenewsNext

मानवी शरीराच्या वजनाच्या साधारणपणे २ टक्के वजन असणारे यकृत हे अवयव शरीरातील महत्त्वाचं अवयव आहे. याच यकृताला कोणत्या कारणामुळे आजार होतात याची माहिती घेणे आवश्यक आहे. असाच एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर. जाणून घेऊया त्याची लक्षणे अन् उपाय.

फॅटी लिव्हर म्हणजे काय?
लिव्हरमध्ये काही प्रमाणात चरबी असणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतू लिव्हरमधील चरबीचे प्रमाण लिव्हरच्या वजनाच्या साधारणपणे दहा टक्याने वाढल्यास फॅटी लिव्हर आजार उद्भवतो. अश्या परिस्थितीत, लिव्हरची काम करण्याची क्षमता कमी होते. त्याचे कार्य बिघडते आणि विविध लक्षणे दिसू लागतात. खरंतर लिव्हरवर परिणाम झाल्यानंतर बाह्य लक्षणे दिसून येण्यास बराच काळ जावा लागतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पित्त दोष हे फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे. शरीरात जास्त प्रमाणात पित्त तयार झाल्यामुळे दोष उत्पन्न होतो आणि लिव्हरचे कार्य बिघडण्यास सुरुवात होते.

फॅटी लिव्हरची लक्षणं
फॅटी लिव्हरची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे खरंतर उपचार करण्यास उशीर होऊ शकतो. परंतु आपण त्यावर लक्ष ठेवून लक्षणं आढळल्यास लवकर उपचार करू शकतो.

  • पोटात उजव्या बाजूला वरच्या भागात वेदना होणे.
  • वजन लक्षणीयरित्या घटणे
  • अशक्तपणा अथवा थकवा जाणवणे
  • डोळे आणि त्वचा पिवळसर दिसणे
  • अपचन होणे, अन्नावरची वासना उडणे, वारंवार पित्त होणे
  • पोटात सूज येणे
     

फॅटी लिव्हरचे २ प्रकार 

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर
नावाप्रमाणेच ह्या आजारामध्ये लिव्हरचे कार्य बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे अति मद्यपान. खूप जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरला सूज येते, लिव्हरवर चरबीचे थर साठत जातात आणि तिथे जखमा देखील होऊ शकतात.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर
जास्त चरबीयुक्त भोजन केल्यामुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलता वाढते आणि डायबिटीस होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते. अशा वेळी मद्यपान न करता सुद्धा फॅटी लिव्हरहा आजार होऊ शकतो.

फॅटी लिव्हरवर घरगुती उपाय
हळद

फॅटी लिव्हरवर आराम मिळवायचा असेल तर जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल.

आवळा
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे लिव्हरचे कार्य सुधारते. म्हणून कच्चा आवळा किंवा आवळ्याची पावडर घेतली असता फायदा होतो.

ताक
दुपारच्या जेवणानंतर हिंग, जिरे, काळीमिरी आणि मीठ घातलेलं ताक पिणे हे फॅटी लिव्हरसाठी उपयुक्त आहे. यामुळे अन्नाचे योग्य रीतीने पचन होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

ग्रीन टी 
ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात त्यामुळे लिव्हरचे कार्य सुधारून त्यावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.

लिंबू
लिंबू, संत्रे अशा फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे फॅटी लिव्हर बरे होण्यास मदत होते.

Web Title: Pay attention to the liver in time, otherwise fatty liver can occur, know the symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.