Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, म्यूटेशन जास्त असलं तरी कमी धोकादायक असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:39 AM2021-11-29T11:39:41+5:302021-11-29T11:42:46+5:30

Omicron Variant Image : Omicron च्या वरच्या भागात प्रोटीन असतं जे मानवी कोशिकांसोबत संपर्क करतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की, Omicron जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेट होतो म्हणजे Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त खतरनाक आहे. 

Omicron first image by Rome bambino gesu hospital covid new variant | Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, म्यूटेशन जास्त असलं तरी कमी धोकादायक असल्याचा दावा

Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, म्यूटेशन जास्त असलं तरी कमी धोकादायक असल्याचा दावा

googlenewsNext

इटलीच्या (Italy) रोममधील प्रतिष्ठीत बम्बिनो गेसु हॉस्पिटल (Bambino Gesu Hospital) ने दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट Omicron चा पहिला फोटो जारी केला आहे. यावरून हे स्पष्ट होत असल्याचा दावा केला जात आहे की, Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त म्यूटेशन होतं. Omicron ची डिजीटल इमेज जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनुसार, Omicron च्या वरच्या भागात प्रोटीन असतं जे मानवी कोशिकांसोबत संपर्क करतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की, Omicron जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेट होतो म्हणजे Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त खतरनाक आहे. 

timesofisrael.com एका रिपोर्टनुसार, वैज्ञानिक म्हणाले की, जेव्हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट Omicron वर आणखी रिसर्च केल्यावर समजेल की हा व्हेरिएंट न्यूट्रल आहे, कमी खतरनाक आहे किंवा आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे का?

मिलान स्टेट यूनिव्हर्सिटीचे क्लीनिकल मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर क्लाॉडिया अल्टेरी म्हणाल्या की, रिसर्च टिम  कोरोनाचा नवा व्हेरिएंट Omicron च्या म्यूटेशनबाबत जाणून घेण्यासाठी त्याच्या थ्रीडी स्ट्रक्चरवर फोकस करत आहे. Omicron ची ही इमेज साऊथ आफ्रिका, बोत्सवाना आणि हॉंगकॉंगच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. 

त्या पुढे म्हणाल्या की, कोविडच्या नव्या व्हेरिएंटची इमेज एखाद्या नकाशासारखी दिसते. जी म्यूटेशनला दाखवते. पण याच्या म्यूटेशनच्या भूमिकेबाबत काही सांगत नाही. प्रोफेसर क्लॉडिया अल्टेरी म्हणाल्या की, Omicron अजून अनेक एक्सपरिमेंट करणं बाकी आहे. ज्यानंतर समजेल की, याचं ट्रान्समिशन कसं आहे? किंवा याचा कोविड लस घेतलेल्या  लोकांवर काय प्रभाव पडेल.

Web Title: Omicron first image by Rome bambino gesu hospital covid new variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.