Navratri 2019 : उपवासादरम्यान वजन करायचंय कमी? 'हे' पदार्थ आहेत उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:51 PM2019-09-30T15:51:37+5:302019-09-30T15:52:00+5:30

नवरात्रोत्सवास मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात.

Navratri 2019 Special healthy diet plan and food for navratri fastor upvas | Navratri 2019 : उपवासादरम्यान वजन करायचंय कमी? 'हे' पदार्थ आहेत उत्तम पर्याय

Navratri 2019 : उपवासादरम्यान वजन करायचंय कमी? 'हे' पदार्थ आहेत उत्तम पर्याय

Next

नवरात्रोत्सवास मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात. काही लोक फक्त पहिला दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास ठेवतात. तर काही लोक संपूर्ण ९ दिवसांचा उपवास ठेवतात. पण तुम्ही जर फिटनेस फ्रिक असाल आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नवरात्रीचा उपवास करू शकता. आज आम्ही अशा काही सुपरफुड्सबाबत सांगणार आहोत, जे उपवासासोबतच संपूर्ण पोषण देण्यासोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. 

साबुदाण्याची खिचडी 

उपवासादरम्यान अशा पदार्थांचं सेवन करावं जे हेल्दी असण्यासोबतच पचण्यासही हलके असतील. साबुदाणा यासाठी उत्तम पदार्थ आहे. साबुदाण्याची खिचडी तयार करण्यासाठी फारसं साहित्यही लागत नाही. तसेच वेळेचीही बचत होते. साबुदाण्याची खिचडी तयार करण्यासाठी बटाटा, शेंगदाणे, कोथिंबीरीची आवश्यकता असते. साबुदाणा खिचडीमध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असतात. जे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. 

केळी, अक्रोडड, बदाम लस्सी 

उपवासादरम्यान हेल्दी पदार्थ खाणं गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसाची सुरुवात केळी, अक्रोड-बदाम असणाऱ्या लस्सीने करा. केळी, अक्रोड, बदाम आणि दह्यासोबत तुम्ही हेल्दी आणि टेस्टी लस्सी तयार करू शकता. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पोषक तत्व मिळून देण्यासाठी मदत होते. 

मखान्याची खीर 

उपवासाच्या दिवसांमध्ये अनेक लोक मीठ असणारे पदार्थ फार कमी खातात. त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाऊ नये. अन्यथा ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. नवरात्रीमध्ये मखान्याची खीर सर्वात जास्त सेवन करण्यात येणारी रेसिपी आहे. मखान्याची खीर तुम्ही दूध आणि गुळासोबत तयार करू शकता. तसचे या खीरीची चव वाढविण्यासाठी ड्रायफ्रुट्स एकत्र करू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Navratri 2019 Special healthy diet plan and food for navratri fastor upvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.