Mucormycosis infection : चिंताजनक! कोरोनानंतर वाढतोय म्यूकोरमायकोसिसचा धोका; समोर आला मेंदूवर हल्ला करणारा फंगस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:54 PM2021-05-10T13:54:24+5:302021-05-10T14:09:45+5:30

Mucormycosis infection : म्यूकोरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हे ब्लॅक फंगस म्हणून देखील ओळखले जाते. त्याचा परिणाम नाक, डोळे, मेंदूत दिसून येतो. जेव्हा ब्लॅक फंगस येते तेव्हा लोक त्यांचे दृष्टी गमावतात.

Mucormycosis infection : Post covid black fungal infection know all about mucormycosis infection symptoms and treatment | Mucormycosis infection : चिंताजनक! कोरोनानंतर वाढतोय म्यूकोरमायकोसिसचा धोका; समोर आला मेंदूवर हल्ला करणारा फंगस

Mucormycosis infection : चिंताजनक! कोरोनानंतर वाढतोय म्यूकोरमायकोसिसचा धोका; समोर आला मेंदूवर हल्ला करणारा फंगस

Next

दिल्लीमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनामुळे "म्यूकोरमायसिस" प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. म्यूकोरमायसिस हे कोरोनामुळे होणारं एक फंगल संक्रमण आहे.  सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं."

काय आहे म्यूकोरमायकोसिस

म्यूकोरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हे ब्लॅक फंगस म्हणून देखील ओळखले जाते. त्याचा परिणाम नाक, डोळे, मेंदूत दिसून येतो. जेव्हा ब्लॅक फंगस येते तेव्हा लोक त्यांचे दृष्टी गमावतात. गंभीर संक्रमण झाल्यास यामुळे काही रूग्णाच्या जबडा आणि नाकाची हाड वितळते. जर रुग्ण वेळेवर ठीक बरा होत नसेल तर मृत्यू देखील होऊ शकतो. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉक्टर व्हीके पॉल यांनी यापूर्वी असे म्हटले होते की म्यूकोरामायसिस हा 'म्यूकोर' नावाचा एक बुरशीजन्य रोग आहे जो बहुधा शरीरातील ओल्या पृष्ठभागावर आढळतो. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

'ब्लॅक फंगस किंवा म्यूकोमायकोसिस हा नवीन रोग नाही. हे केवळ नाक, कान आणि घशालाच नव्हे तर शरीराच्या इतर भागांनाही नुकसान करते, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रोग मोठ्या प्रमाणात रूप धारण करीत आहे, कारण हा रोग रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे होतो. पूर्वी हा रोग केमोथेरपी, अनियंत्रित मधुमेह, प्रत्यारोपणाच्या रूग्ण आणि वृद्ध लोकांमध्ये दिसायचा. पण आता कोविड १९ च्या रुग्णांमध्येही हा आजार दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते बुरशीमुळे डोळ्यातील सूज येते, ज्यामुळे एक किंवा दोन दिवसात डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. बहुतेक रूग्णांची दृष्टी कमी झाली आहे. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

लक्षणं

नाकातून जाड किंवा पातळ स्त्राव होणं

नाकाच्या आजूबाजूला सूज येणं

डोळे दुखणं

डोकेदुखी

दृष्टी कमी होणं.

कमकुवत इम्यूनिटी असलेल्यांना धोका जास्त

मॅक्सचे कोविड तज्ज्ञ डॉक्टर रोमल टिक्कू म्हणाले की ''ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना अशा प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे, मधुमेह, कर्करोग, प्रत्यारोपण, एचआयव्ही रूग्ण आणि ज्यांना स्टिरॉइड्स किंवा ऑक्सिजन आहे त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.'' अशा स्थितीत  रुग्णाची एमआरआय आणि सीटी स्कॅन त्वरित करावी लागते. त्या आधारावर पुढील उपचार निश्चित केले जातात.  काही वेळा, जबड्यावर देखील परिणाम होतो.  

Web Title: Mucormycosis infection : Post covid black fungal infection know all about mucormycosis infection symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.