पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 11:17 AM2019-07-07T11:17:45+5:302019-07-07T11:19:01+5:30

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात.

Monsoon Special workout tips follow these workout tips in rainy season | पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

Next

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. पण पावसाळ्यामध्ये मात्र अनेकांना जिमला जाणं शक्य होत नाही. तर अनेकदा जॉगिंग करणंही शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्सून वर्कआउट टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमची वेळ वाचण्यासोबतच तणावही दूर होण्यास मदत होते. 

पावसाळ्याचं आनंददायी वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तसेच पावसाळ्यातील आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची सर्व समस्यांपासून सुटका होते. खाली सांगितलेल्या मान्सून स्पेशल वर्कआउट टिप्स तुम्हाला पावसाळ्यात फिट आणि फाइन ठेवण्यासाठी मदत करतील. 

मानसून वर्कआउट टिप्स (Monsoon workout tips)

(Image Credit : Go4Life - NIH)

प्लॅन करा 

मान्सूनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करणं आवश्यक आहे. तसेच वर्कआउट करण्यासाठी खास नियमावली करणंही फायदेशीर ठरेल. त्यानुसार तुम्ही कमीत कमी 45 मिनिटांचा अवधी वर्कआउट करण्यासाठी राखून ठेवणं गरजेचं असतं. 

स्ट्रेचिंग

पावसाळ्यामध्ये जिममध्ये जाणं शक्य झालं नाही तर, घरच्या घरी स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाला सुरुवात करू शकता. त्यामुळे शरीराचा वॉर्मअप होण्यास मदत होते. त्यानंतर 5 मिनिटांसाठी स्पॉट जॉगिंग करा. जॉगिंग जाल्यानंतर 15 मिनिटांसाठी कार्डियो एक्सरसाइज करू शकता. त्यामुळे हृदयाची गती वाढून शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते. 

(Image Credit : pistonclasico.com)

सोपे व्यायामाचे प्रकार करा 

शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या, पायऱ्यांची चढ-उतार, उड्या मारणं आणि जंपिंग जॅक यांसारखे व्यायाम तुम्ही करू शकता. असं केल्याने शरीराचे सांधे मजबूत होण्यासोबतच शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. 

(Image Credit : Runtastic)

स्क्वाट वाढवतील लवचिकता 

20 स्क्वाट, 20 लंग्स आणि 20 पुशअप्स आलटून-पालटून 3 ते 4 वेळा करा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे सेट 2 ते 4 वेळा पुन्हा करू शकता. 

घरी डंबेल्स असणं ठरतं फायदेशीर 

जिममध्ये एक्सरसाइज करण्याव्यतिरिक्त काही व्यायाम उपकरणं घरी ठेवणं फायदेशीर ठरतं. डंबेल्स, स्किपिंग रोप, रेसिटेंस ट्यूब इत्यादी. याव्यतिरिक्त जमिनिवर करण्यात येणाऱ्या प्लांक, क्रंचेज आणि लेग रेज यांचाही अभ्यास करा. 

योगाभ्यास ठरतो फायदेशीर 

योगाभ्यास तुम्ही घरात किंवा घराच्या बाहेरही करू शकता. योगाभ्यासातील काही सोप्या आसनांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. तसेच योगाभ्यासामुळे श्वसनासंबंधातील समस्यांपासूनही सुटका होते. 

टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Monsoon Special workout tips follow these workout tips in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.