अनेक वर्षांपासून सिगारेट ओढणाऱ्याचं पूर्ण शरीर पडलं पिवळं, डॉक्टरांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:04 PM2021-02-02T12:04:40+5:302021-02-02T12:05:29+5:30

चीनच्या जियांग्सु प्रांतात राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, त्याला जॉन्डिस आहे.

A man in China who is a chain smoker for three decades turns vibrant yellow due to this reason | अनेक वर्षांपासून सिगारेट ओढणाऱ्याचं पूर्ण शरीर पडलं पिवळं, डॉक्टरांनी सांगितलं कारण...

अनेक वर्षांपासून सिगारेट ओढणाऱ्याचं पूर्ण शरीर पडलं पिवळं, डॉक्टरांनी सांगितलं कारण...

googlenewsNext

(प्रातिनिधिक छायाचित्र)

चीनमधून एक फार हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीचं शरीर पूर्णपणे पिवळं पडलं आहे. ही व्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून चेन स्मोकर होती. हा रंग इतका गर्द आहे की, असं वाटतं की या व्यक्तीवर पिवळ्या रंगाचा पेंट लावला आहे. चीनच्या जियांग्सु प्रांतात राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, त्याला जॉन्डिस आहे.

एनएचएस वेबसाइटनुसार, जॉन्डिसमुळे कोणत्याही व्यक्तीचं शरीर पिवळं पडू शकतं. त्यासोबतच डोळ्यांचा पांढरा  भागही पिवळा होऊ शकतो. हे शरीरात पिवळ्या रंगाचे बिलीरूबीन जमा झाल्याने होत असतं. हा लिव्हरशी संबंधित आजारही असू शकतो आणि अशा स्थितीत लगेच मेडकिल हेल्प घेतली गेली पाहिजे. मात्र, या व्यक्तीच्या शरीराचा रंग फार जास्त ब्राइट पिवळा झाला होता.

डॉक्टरांनी सांगितले होते की, या व्यक्तीच्या अग्नाशयात ट्यूमर झाला होता आणि हा ट्यूमर इतका मोठा होता की, ज्यामुळे या व्यक्तीच्या पित्त नलिका ब्लॉक झाल्या होत्या. त्याला जॉन्डिस झाला होता. डॉक्टर म्हणाले की, अत्याधिक सिगारेट ओढल्याने या व्यक्तीच्या कोशिकांची साइज सामान्यापेक्षा अधिक वाढली होती आणि त्याची स्थिती फार वाईट झाली होती.

डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीची लाइफस्टाईल फार खराब होती आणि गेल्या तीस वर्षांपासून मद्यसेवन करत होता. सोबतच स्मोकिंगही करत होता. या व्यक्तीचा ट्यूमर काढण्यात आला आहे ज्यानंतर या व्यक्तीचा स्कीन कलरही सामान्य झाला आहे. डॉक्टर असंही म्हणाले की, त्याने जर त्याची लाइफस्टाईल सुधारली नाही तर त्याला वाचवणं अशक्य होईल.
 

Web Title: A man in China who is a chain smoker for three decades turns vibrant yellow due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.