गोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं गुपित तुम्हाला माहीत आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 01:20 PM2019-12-23T13:20:52+5:302019-12-23T15:19:39+5:30

आपल्याला कोणताही आजार झालेला असेल तरी दवाखान्यात किंवा मेडिकलमध्ये जेव्हा आपण गोळ्या घ्यायला जातो.

know the secret of different colour of pills? | गोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं गुपित तुम्हाला माहीत आहे का? 

गोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं गुपित तुम्हाला माहीत आहे का? 

googlenewsNext

आपल्याला कोणताही आजार झालेला असेल तरी दवाखान्यात किंवा मेडिकलमध्ये जेव्हा आपण गोळ्या घ्यायला जातो. तेव्हा त्या गोळ्या वेगवेगळ्या रंगात असतात. पण तुम्ही  कधी विचार केला आहे की आपल्याला आजारांपासून दूर ठेवणाऱ्या गोळ्या वेगवेगळ्या रंगाच्या का असतात. किंवा एखाद्या गोळीचा रंग कोणता असावा हे कसं ठरवलं जातं. चला तर मग जाणून घेऊया गोळ्यांच्या रंगांमागचं कारण काय असतं. 

रंग हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. रंगांचा आपल्या डोळ्यांवरच नाही तर शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. आपल्या शरीरात भाव-भावना तसंच उर्जा निर्माण करण्यासाठी रंग महत्वपूर्ण असतात. अनेक प्रकारच्या रिसर्च रिर्पोटनुसार रंग आणि आपलं शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. जर तुम्ही आजारी असाल तर त्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी रंग उपयुक्त ठरतात. कोणत्याही आजाराचे औषध घेण्याआधी त्या गोळ्यांचा रंग हा प्रभावित करत असतो. 

अनेक लोकं या गोष्टीशी सहमत असतील की रात्री चांगली झोप येण्यासाठी हलक्या निळ्या रंगाच्या कॅप्सूल्स दिल्या जातात. जर  कोणाला अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तेव्हा निऑन ग्रीन रंगाच्या किंवा हलक्या  गुलाबी रंगाचे टॅब्लेट्स दिले जातात. कारण खूप लोकं हा रंग आणि सायट्रिक अ‍ॅसिड यांचा संबंध जोडतात. आणि पोटाच्या समस्येसाठी अशा रंगाच्या गोळ्यांचं सेवन केलं जातं.

वेगवेगळ्या रंगांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. जसं की लाल रंग पल्सरेट, ब्लड प्रेशर यांना सुरळित ठेवतो. निळा आणि पांढरा रंग हा शांतता दर्शवत असल्यामुळे याचा वापर डोकदुखी,  ताण-तणाव अशा प्रकारच्या समस्या दूर ठेवण्यासाठी केला जातो. म्हणूनच हॉस्पिटलसच्या  भिंतीवर आरामदायक आणि शातं हलक्या शेडचे रंग असतात. तसंच रुग्णांच्या खोलीत सुद्धा लाल, पिवळा असे भडक आणि बटबटीत रंग असतील तर चिंता आणि ताण-तणाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना आणि शरीराला शांतता देणारे रंग वापरले जातात.

Web Title: know the secret of different colour of pills?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.