नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:37 PM2021-07-28T17:37:43+5:302021-07-28T17:38:14+5:30

आपल्याला फळे खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

know right method of eating fruits, avoid theses mistakes while eating fruits | नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..

नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..

googlenewsNext

फळ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात, या बद्दल आपल्याला बहुदा माहितीच नसते. जर एखादी व्यक्ती अन्न सोडून केवळ फळे खात असेल, तर तो आपले संपूर्ण आयुष्य सहजपणे जगू शकेल. एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात 

याशिवाय फळे अगदी सहज पचतात, कारण त्यात 80 ते 90 टक्के पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करते, म्हणून ते खाण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण जर आपल्याला फळ खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

‘अशा’ प्रकारे फळे खाल्ल्यास होते नुकसान

आपल्यापैकी बहुतेकजण फळे खाताना काही सामान्य चुका करतात. जसे की आपण आंबा किंवा इतर कोणतेही फळ जेवल्यानंतर खातो, किंवा एखाद्या फंक्शनमध्ये असताना प्रथम फ्रुटचाट भरभरून खातो आणि नंतर जेवतो. अशा परिस्थितीत फळ आपल्या शरीराला लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरतात आणि आम्लपित्त, पोट फुगणे, आंबट ढेकर, गॅस यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपण खाण्याला दोष देऊन मोकळे होतो.

‘या’ हानीमागचे कारण जाणून घ्या!

वरील परिस्थिती आपल्याला शरीराला झालेला तोटा हा अन्नामुळे नव्हे, तर फळांमुळे आहे. कारण, फळ स्वतःच एक संपूर्ण आहार आहे. त्यासोबत आणखी काही खाण्याची गरज नाही. याशिवाय फळाला स्वतःची नैसर्गिक साखर असते. साखर कोणत्याही गोष्टीमध्ये किण्वन सुरू करते. म्हणून फळांसोबत खाल्लेले अन्न किंवा फळ खाल्ल्यानंतर लगेच खाल्लेले अन्न, त्या फळात असलेल्या साखरेमुळे सडण्यास सुरुवात होते आणि आपल्याला पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात.

फळे खाण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

खरं तर, फळ खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे फळाचे सेवन केल्यानंतर किमान 45 मिनिटे ते तासाभर काहीही खाऊ नये. याशिवाय जेव्हा जेव्हा फळ खाता तेव्हा लक्षात ठेवा की, आपले पोट त्यावेळी रिक्त असले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल आणि ते सहज पचतील. लक्षात ठेवा की, फळांना इतर कशाचीही आवश्यकता नसते, ते स्वतःमध्ये एक परिपूर्ण आहार आहेत. हेच कारण आहे की, जुन्या काळातही ऋषी मुनि केवळ फळे खाऊन आपले जीवन जगत असत. म्हणून भरपूर फळे खा आणि निरोगी राहा.

म्हणे एलियन्स येणार पृथ्वीवर, करणार युद्ध

Web Title: know right method of eating fruits, avoid theses mistakes while eating fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.