डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:57 AM2019-08-28T11:57:53+5:302019-08-28T12:03:50+5:30

पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात.

Know about mosquito borne diseases apart from dengue and malaria | डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात

डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात

googlenewsNext

पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. त्यामुळे घरासोबतच घराच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाईही गरजेची आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचत असेल तर ते पाणी काढून स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. 

डास चावल्यामुळे अनेक आजार होतात. ज्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया हे आजार तर आपल्याला माहितच आहेत. पण मागील काही वर्षांपासून डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच आजारांबाबत सांगणार आहोत. जे डासांच्या चावल्यामुळे होतात. आणि त्यांची लक्षणंही गंभीर असतात. 

वेस्ट नाइल 

वेस्ट नाइल हा आजार क्यूलेक्स प्रजातिचा डास चावल्याने होतो. या आजाराचा थेट परिणाम व्यक्तीच्या मेंदूवर होतो. वेस्ट नाइल वायरस असणारा डास चावल्याने अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण अनेकदा ताप, डायरिया, सांधेदुखी आणि उलट्या होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. अनेकदा आजार वाढल्याने मेनन्जाइटिस आणि इंसेफ्लाइटिस यांसारख्या ब्रेन इन्फेक्शन असणारे आजारही उद्भवतात. 

झिका

डास चावल्याने होणाऱ्या गंभीर आजारांमध्ये झिका वायरसचाही समावेश होतो. हा आजार वाढल्याने व्यक्तीला जीवही गमवावा लागू शकतो. झिका वायरसची लागण झाल्यानंतर सुरुवातीला काही खास लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे या आजाराबाबात समजणं फार कठिण असतं. डोळे लाल होणं, ताप येणं, सांधेदुखी ही लक्षणं आहेत. गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी हा आजार जास्त धोकादायक आहे. कारण या व्हायरसमुळे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आईसोबतच तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरही परिणाम होतो. 

ला क्रॉस इन्सेफलायटिस 

ला क्रॉस इन्सेफलायटिस हा वायरल आजार आहे. जो डास चावल्याने होतो. या वायरसचा डास साधारणतः दिवसा चावतो. या आजाराने पीडित लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत. परंतु, गंभीर परिस्थितीमध्ये व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. तसेच अनेकदा पॅरॅलिसिसही होऊ शकतो. 

येल्लो फीवर 

येल्लो फिवरमध्ये अनेकदा कावीळीची लक्षणं दिसून येतात. त्यामुळेच याला येल्लो फिवर असं म्हणतात. यामध्ये त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. अनेक रूग्णांमध्ये कंबरदुखी, उलट्या आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसून येतात. चिकनगुनिया हा देखील डासांमुळे होणारा आजार आहे. यामध्ये पीडित व्यक्तीला संपूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेदना जाणवतात. जर चिकनगुनिया एखाद्या व्यक्तीला झाला तर संपूर्ण बरं होण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो. तसेच या आजाराची लक्षणं म्हणजे, डोकेदुखी, चक्कर येणं आणि उलट्या होणं. 

रिफ्ट वॅली फीवर 

डॉक्टरांना या आजाराची लक्षणं सर्वात आधी केनियामध्ये दिसून आली होती. डासांमुळे हा आजार व्यक्ती आणि प्राण्यामध्ये पसरतो. रिफ्ट वॅली फीवर आफ्रिका, यमन आणि सौदी अरबमध्ये आहे. यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचतं. याव्यतिरिक्त अशक्तपणाही जाणवतो.  

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत असून यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

Web Title: Know about mosquito borne diseases apart from dengue and malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.