'जॉन्सन अँड जॉन्सन'... बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 05:32 PM2019-08-30T17:32:35+5:302019-08-30T17:42:47+5:30

लहान मुलांचे योग्यरित्या संगोपन करणं अत्यंत गरजेचं असतं. पालक मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करत असतात. बाजारात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत.

'Johnson & Johnson' is unwavering belief of parents for the child's health and well-being | 'जॉन्सन अँड जॉन्सन'... बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास

'जॉन्सन अँड जॉन्सन'... बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास

Next

लहान मुलांचे योग्यरित्या संगोपन करणं अत्यंत गरजेचं असतं. पालक मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करत असतात. बाजारात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. मात्र 'जॉन्सन अँड जॉन्सन' हा ब्रँड सर्वाधिक मातांचा विश्वासाचा ब्रँड आहे. बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास असलेल्या 'जॉन्सन अँड जॉन्सन' ची उत्पादनं पिढ्यान पिढ्या वापरली जात आहेत.

लहान मुलांची त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे त्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी या 100 टक्के शुद्ध असणं गरजेच्या असतात. जॉन्सन बेबीची सर्व उत्पादनं ही बाळासाठी पोषक आणि सुरक्षित असणाऱ्या घटकांपासून तयार करण्यात आली आहेत. जॉन्सन बेबी आपल्या वेबसाईटवर विविध उत्पादने आणि त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टींची माहिती ही 100 टक्के पारदर्शकतेसह ग्राहकांना देतं. त्यामुळेच अनेक पालक आपल्या मुलांसाठी  जॉन्सन बेबीच्या उत्पादनांची आवर्जून निवड करतात. 

बाळाच्या नाजूक त्वचेसाठी जॉन्सन बेबीची सर्व उत्पादने सुरक्षित आहेत. लहान मुलांसाठी खास असलेल्या या उत्पादनांसाठी डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. न्यू जॉन्सनची बेबी उत्पादनं तयार करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित साहित्याचा वापर करण्यात येतो. तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची 12 महिने चाचणी घेतली जाते. सुमारे 8 हजार वैद्यकीय चाचण्या घेऊन हे साहित्य शुद्ध आहे की नाही, याची खात्री केली जाते. त्यामुळे लहान बाळांसाठी न्यू जॉन्सन बेबीची उत्पादनं ही पहिल्या दिवसापासून सुरक्षित आहेत. बाळाला हानिकारक ठरेल अशा कोणत्याही गोष्टींचा वापर केला जात नाही.

आजच्या मातांचा कल हा मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या गोष्टी वापरण्याकडे अधिक असतो. जॉन्सन बेबीच्या अनेक उत्पादनांमध्ये 90 टक्के नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. जॉन्सनच्या उत्पादनासाठी वापरण्यात आलेल्या बॉटल्स या पारदर्शक असतात. त्यामुळे त्याचा रंग ग्राहकांना नीट दिसतो तसेच त्याची शुद्धता समजण्यास मदत होते. उत्पादनामध्ये वापरण्यात आलेला प्रत्येक घटक बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याला आणि त्यापासून गोष्टींना पाच स्तरीय सुरक्षा चाचणीतून जावे लागते. तसेच जॉनसन्स बेबी सारखे मंद सुगंध असणारे ब्रँड IFRA(इंटरनॅशनल फ्रेग्रन्स असोसिएशन) चे उच्चतम मानक परिपूर्ण करतात. 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेली टॅल्कम पावडरमध्ये काही हानीकारक घटक असल्याची शंका घेतली जात आहे. मात्र ही पावडरसुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे.  नैसर्गिक सौम्यपणा, सुरक्षेसाठी टॅल्कम वापले जाते. तसेच जॉन्सन बेबी पावडरसाठी वापरण्यात येणारे टॅल्क हे फार्माकोपिया ग्रेडचे असून, एफडीएकडून मान्यताप्राप्त आहे. विविध स्वायत्त संस्थांनी केलेल्या चाचण्यांमध्ये  टॅल्क आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा काही संबंध नसल्याचे समोर आले आहे. ही पावडर क्लिनिकली प्रोव्हन माईल्ड असून, डॉक्टरांकडून मुलांसाठी ति वापरण्याचा सल्ला दिला जातो. जॉन्सन अँड जॉन्सनचे बेबीची उत्पादनं ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने बहुतांश डॉक्टर या उत्पादनांचा वापर आपल्या मुलांसाठी करतात. तसेच जगभरातील कोट्यवधी माताही यावर विश्वास ठेवून त्यांचा आपल्या मुलांसाठी वापर करतात.

Web Title: 'Johnson & Johnson' is unwavering belief of parents for the child's health and well-being

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.